विज्ञान जागर २०१९ कै. पदमश्री . श्री . म. तथा अण्णासाहेब बेहरे विद्यालय,आडे. येथे संपन्न.
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज तर्फे कै. प.
अण्णासाहेब बेहेरे विद्यालयात विज्ञान जागर नुकताच उत्साहात संपन्न झाला.या विज्ञान जागराचे विशेष
म्हणजे इयत्ता १ ली ते १०वी तील विद्यार्थ्यांसमोर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सूक्ष्म जीवशास्त्र ,
रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, भौतिकशास्त्र, संगणक शास्त्र इ. विविध विषयांवर आधारीत सुमारे ४३ वैज्ञानिक
प्रयोगांचे सादरीकरण केले. संशोधन व विज्ञान जिज्ञासा शालेय वयापासूनच विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी
हा त्यामागील मुख्य हेतू होता.विज्ञानजागर या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश
जगदाळे यांच्या हस्ते झाले. या विज्ञान जागर कार्यक्रमामध्ये क्रमश: सूक्ष्मजीवशास्त्र विभागातून एकूण १२
प्रयोगांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी प्रा. पुनम पाटील, प्रा. प्रियांका साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
रसायनशास्त्र विभागातून एकूण १० प्रयोगांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी प्रा. संतोष मराठे, प्रा. तेजाली राऊत
यांच्या मार्गदर्शनाखाली केले. प्राणीशास्त्र विभागातून एकूण ८ प्रयोगांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी प्रा. नंदा
जगताप व प्रा. सुजीत टेमकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले. वनस्पतीशास्त्र विभागातून एकूण ११ प्रयोगांचे
सादरीकरण विद्यार्थ्यांनी प्रा. दिपाली दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली केले. भौतिकशास्त्र विभागातून एकूण
६ प्रयोगांचे सादरीकरण प्रा. विश्वेश जोशी व संगणकशास्त्राचे एकुण ६ प्रयोग प्रा. स्वप्नील साळवी यांच्या
मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी केले.सदर विज्ञान जागर कार्यक्रमात ग्रामीण नागरिकांचा, प्रशालेतील
शिक्षकांचा देखील उत्स्फूर्त सहभाग लाभला.विज्ञान जागर कार्यक्रमात एकूण 13 शाळांचे 450 विद्यार्थी
व २५ शिक्षकवृंद सहभागी झाला होता. याप्रसंगी कै. प. अण्णासाहेब विद्यालयाचे व्यवस्थापन समितीचे
चेअरमन रवींद्र कालेकर व समितीचे इतर सदस्य, माननीय सरपंच आणि इतर मान्यवर देखील उपस्थित
होते.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे व प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. शशीशेखर
शिंदे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच विज्ञान संघटनेचे समन्वयक प्रा. संतोष मराठे व नियोजक प्रा. पुनम
पाटील यांनी देखील विशेष मेहनत घेतली.