राष्ट्रीय सेवा योजना शिबीर निगडे येथे उत्साहात संपन्न..
राष्ट्रीय सेवा योजना विभाग दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेज दापोलीचे ७ दिवसीय विशेष
शिबीर मंगळवार दिनांक 3/12 /19 ते 9/12/19 या कालावधीत दत्तक गाव निगडे तालुका दापोली येथे
उत्साहात संपन्न झाले.
शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉ. सुभाष चव्हाण माजी कुलगुरू कोकण कृषी विद्यापीठ , दापोली
यांच्या हस्ते झाले.
उद्घाटन प्रसंगी संस्थेचे सौरभ बोडस हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
या निवासी शिबिरामध्ये सहा वनराई बंधारे, रस्ते दुरुस्ती, शोष खड्डे , शाळा परिसर स्वच्छता व
रंगरंगोटी, स्मशान भुमी रस्ता स्वच्छता , दंत तपासणी शिबिर इ कार्यक्रम घेण्यात आले. दिनांक
७/१२/२०१९ रोजी शिबीरार्थी , शाळेतील व बालवाडीतील विद्यार्थ्यांनी सुंदर असा सांस्कृतिक कार्यक्रम
सादर केला. याच दिवशी ग्रामस्थ महिलांसाठी हळदी कुंकु समारंभ आयोजित करण्यात आला होता. या
समारंभ प्रसंगी कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. शाळेतील मुलांच्या विविध स्पर्धा या दरम्यान
घेण्यात आल्या व त्यांना प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या शिबिरासाठी सरपंच सौ.
विनया पवार ,श्री खेमदेव विकास मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र रेवाळे शालेय समितीचे अध्यक्ष श्री. लंकेश पाते
व इतर पदाधिकारी,शाळेतील मुख्याध्यापक सौ. नेहा पुळेकर ,सर्व ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य
मिळाले.या शिबीराचा समारोप कार्यक्रम दिनांक ९ डिसेंबर रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश
जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.संपूर्ण शिबिराच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र
मोरे , प्रा. अजिंक्य मुलुख , प्रा. मनोज लाड , प्रा.जगदीश करबेळे, प्रा. अक्षता मुरडकर , प्रा. पुजा रेळेकर
, प्रा. मुग्धा बर्वे , विद्यार्थी प्रतिनिधी निशांत तासकर , शिवानी नाटेकर , सौरभ लवाटे अलिजा परकार
व शिक्षकेतर कर्मचारी अनिकेत घोसाळकर , मंजुषा येडेकर यांनी विशेष मेहनत घेतली. या निवासी
शिबिरासाठी दापोली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, चेअरमन, सेक्रेटरी व सन्माननीय संचालक मंडळाचे विशेष
सहाय्य व मार्गदर्शन लाभले