राष्ट्रीय सेवा योजना विभाग (N.S.S.) अंतर्गत १००० वृक्षांचे यशस्वी रोपण……
दापोली अर्बन बँक सिनअर सायन्स कॉलेज मध्ये गुरुवार दि. १8 जुलै २०१९ रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभाग (N.S.S.) आणि वनविभाग जालगाव ग्रामपंचायत , दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने १००० वृक्षांची लागवड करण्यात आली.
या मध्ये शेती उपयुक्त साग , काजु , आवळा , आंबा , बांबुइ. वृक्षांचा समावेश होता.
या वृक्षारोपणाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी प्रमुख निशांत तासकर , शिवानी नाटेकर यांच्या बरोबर एकुण ६८ स्वयंसेवकांनी विशेष मेहेनत घेतली.
प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांच्या अध्यक्षते खाली त्यांचे नेतृत्व प्रा. राजेंद्र मोरे , प्रा. अजित मुलुख , प्रा. मृणाल मुळे , प्रा. मुग्धा बर्वे , प्रा. अक्षता मुरुडकर या प्राध्यापक वर्गाने केले.
हा कार्यक्रम रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण , लोकप्रतिनिधी आमदार संजय कदम , तहसिलदार दापोली , जालगाव ग्रामपंचायती चे सर्व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.