राष्ट्रीय युवा दिन – स्वामी विवेकानंद जयंती आणि राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात संपन्न
आज दिनांक १२ जानेवारी २०२० रोजी दापोली अर्बन बॅंक सिनिअर सायन्स कॉलेजच्या ग्रंथालयात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय युवा दिन – स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती
साजरी करण्यात आली. याप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी प्रतिमेचे पुजन केले. प्रा. दिगंबर कुलकर्णी यांनी काही प्रेरणादायी प्रसंग सांगुन या दोन्ही व्यक्तीमत्वांची सर्वांना माहिती करुन दिली. ग्रंथालयात स्वामी विवेकानंदांची ओळख करुन देणारे ‘ वेदांत केसरी ‘ नावाचे मासिक ही तरुणांना वाचनासाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
तसेच या राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून ‘ पुस्तक प्रदान सोहळाही ‘ संपन्न झाला ज्यामध्ये विविध पुस्तक दात्यांनी ग्रंथालयास दान केलेली पुस्तके प्राचार्यांच्या हस्ते ग्रंथपाल श्रीमती किर्ती परचुरे यांना देण्यात आली.