*राष्ट्रीय परिसंवाद चर्चासत्रामध्ये दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या प्राणिशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश
दापोली येथील दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय परिसंवाद चर्चासत्रांमध्ये विविध विषयांवर सर्वोत्तम शोध निबंधांचे प्रस्तुतीकरण करुन पारितोषिके प्राप्त करण्यात यश मिळविलेले आहे.
महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्रविभागातील कु. जान्हवी पाटील आणि आयेशा मुरुडकर या विद्यार्थिनींनी प्रा.नंदा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली
२५ आणि २६ मार्च २०२२ रोजी झालेल्या ‘ नॅशनल कोविड पॅंडेमिक : इमपॅक्ट ऑन सस्टॅनिबीलीटी ऑफ
ॲग्रिकल्चर, लाईव्ह स्टॉक ॲन्ड बायोडायव्हरसिटी ‘ या राष्ट्रीय परिसंवादामध्ये ‘ डेव्हलपमेन्ट इन पेस्टिसाईडस ऑफ कंट्रोल
ॲंड प्रिव्हेन्शन ऑफ
ॲफ्रिकन जायंट स्नेल्स,
ॲकॅंटिना फुलिका, इन जालगाव, दापोली. जिल्हा- रत्नागिरी (एम. एस.) ‘ आणि ‘ अ स्टडीज ऑन बटर फ्लाय डायव्हरसिटी इन नादगाव व्हिलेज
ॲंड गुलमोहर पार्क इन खेड तहसिल, जिल्हा- रत्नागिरी( एम.एस),’ या विषयांवर आपले शोध निबंध प्रस्तुत केले.
१९० सहभागीतांचा समावेश असणाऱ्या या राष्ट्रीय परिसंवाद चर्चासत्रात कु. जान्हवी पाटील या विद्यार्थीनीच्या शोध निबंधास तृतीय क्रमांक प्राप्त होऊन महाविद्यालयाच्या यशात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
याप्रसंगी संस्थेचे संचालक सदस्य यांनी महाविद्यालयाच्या यशाचे कौतुक केले असुन याप्रसंगी प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. राजेंद्र मोरे यांनी विद्यार्थ्यांच्या संशोधनास उत्तेजन दिलेले असुन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांस संशोधक प्रवृत्ती जोपासण्यासाठी आवाहन केले आहे.