युवा महोत्सवाच्या साहित्य स्पर्धा प्रकारात ‘दापोली अर्बनचा’ दबदबा कायम- विभागीय स्पर्धेत एकूण 7 नामांकने
मुंबई विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन 57 व्या युवा महोत्सवाच्या उत्तर रत्नागिरी विभागातील फेरीत दापोली अर्बन बँक सीनिअर सायन्स कॉलेज ने 7 नामांकने प्राप्त करून विभागीय जनरल चॅम्पियनशिप मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.
खेड येथील आय.सी.एस. कॉलेज येथे पार पडलेल्या स्पर्धेत महाविद्यालयाने साहित्य स्पर्धा प्रकारात आपला दबदबा कायम ठेवत 6 पैकी 5 स्पर्धा प्रकारात पारितोषिक मिळविले. आयशा खोत हिने सलग तिसर्या वर्षी इंग्रजी वक्तृत्वात प्रथम क्रमांक तसेच फरहा भारदे हिच्या साथीने इंग्रजी वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. अक्षता जोशी हिने मराठी कथाकथन तर श्रुती साखळकर हिने मराठी वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. श्रुती साखळकर-रसिका ओक ह्या जोडीला मराठी वादविवाद स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त झाला. याचबरोबर स्किट स्पर्धाप्रकारात महाविद्यालयाने प्रथेप्रमाणे पारितोषिक पटकावले. शुभम लोवरे, श्वेता मुलूख, देवेंद्र महाडिक, शिवम शिंदे, ग्रीष्मा खानविलकर, सार्थक गुरव, आर्यन बैकर, कार्तिक गुरव या संघाला व्दितीय पारितोषिक प्राप्त झाले. कोलाज स्पर्धेत जान्हवी साळगावकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.कैलास गांधी, प्रा. संतोष मराठे, नाट्यविभाग समन्वयक प्रा.अजिंक्य मुलूख, साहित्य विभाग समन्वयक प्रा. तेजस मेहता तसेच सांस्कृतिक विभाग प्रतिनिधी प्रा.अनिरुद्ध सुतार, प्रा. सिद्धी साळगावकर, प्रा. सेजल महाडिक-मोहिते तसेच माजी विद्यार्थी जयवंत काटकर, श्रेयस मेहेंदळे यांचे मार्गदर्शन लाभले. यानिमित्त संस्थेचे सर्व संचालक मंडळ तसेच प्राचार्य डॉ.संदेश जगदाळे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.