मुंबई विद्यापीठाची आविष्कार रिसर्च कन्वेनशन २०२२ ची कार्यशाळा दापोली येथे संपन्न.
मुंबई विद्यापीठ विद्यार्थी कल्याण विभाग आणि दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २७ ऑगस्ट २०२२ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील महविद्यालयासाठीची ‘आविष्कार रिसर्च कन्वेनशन २०२२ -२३ ‘ ची कार्यशाळा महाविद्यालयाच्या सभागृहात यशस्वीपणे पार पडली.
या कार्यशाळेमध्ये आविष्कार स्पर्धेचे मुंबई विद्यापीठ आविष्कार विशेष अधिकारी डॉ. मीनाक्षी गुरव, रत्नागिरी जिल्हा आविष्कार समन्वयक श्री. सुरेंद्र ठाकूरदेसाई, आणि तसेच रोहा येथील डॉ सी. डी. देशमुख महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. सम्राट जाधव हे प्रमुख मार्गदर्शक म्हणुन उपस्थित होते.
कार्यशाळेचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि दापोली एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्री. सौरभ बोडस यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संदेश जगदाळे यांनी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करीत श्री. बोडस यांनी विद्यार्थ्यांच्या विजीगीशु वृत्तीला शोधुन त्यास प्रोत्साहन देत समाजहितासाठी संशोधन करण्यास प्रवृत्त करणाऱ्या या आविष्कार स्पर्धेतील सर्व सहभागी शिक्षक आणि विद्यार्थ्यांस त्यांनी मन:पुर्वक शुभेच्छा दिल्या.
‘ आविष्कार ‘ ही संशोधनास प्रोत्साहन देणारी स्पर्धा असुन विद्यार्थ्यांमध्ये नाविन्याची आवड, संशोधनाची वृत्ती निमार्ण करणे हा या स्पर्धेचा मुख्य हेतु आहे.असे ते म्हणाले. या स्पर्धेत पदवी, पद्व्युत्तर तसेच पी. एच. डी. चे विद्यार्थी तसेच पी.एच. डी. करणारे महाविद्यालयीन शिक्षक सहभागी होऊ शकतात. ही स्पर्धा अत्यंत व्यापक स्वरुपाची असुन विभागीय, विद्यापीठ, राज्यस्तरीय पातळीवर होते. या स्पर्थेच्या मार्गदर्शनासाठी ही कार्यशाळा आयोजित केली होती. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात डॉ. मिनाक्षी गुरव यांनी विज्ञान विषयाच्या विद्यार्थ्यांनी आविष्कार स्पर्धेची तयारी कशी करावी याबद्दल विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच स्पर्धा पात्रता, नियम , विजेत्यांना मिळणारी पारितोषिके व शिष्यवृत्त्या याविषयी देखील त्यांनी विस्तृत स्वरुपात सांगितले तसेच आविष्कार स्पर्धेतील विविध अनुभव त्यांनी मुलांना सांगुन स्पर्धेसाठी प्रोत्साहीत केले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात मानव्यविद्या, भाषा, कला विषयावर रत्नागिरी जिल्हा आविष्कार समन्वयक डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई यांचे मार्गदर्शन झाले. संधोधनासाठी विषय निवडणे, त्याची मांडणी, प्रस्तुतीकरण, संशोधन करताना येणाऱ्या अडचणी व स्पर्धेतील परिक्षकांचे दृष्टीकोन याबद्द्ल त्यांनी माहिती सांगितली. ‘संशोधन करताना तुम्हाला काही सिद्ध करायचे नाही आहे तर सिद्ध झालेले स्विकारायचे आहे ‘ असे ही डॉ. ठाकुरदेसाई सर म्हणाले.