मानवी आरोग्य आणि योग्य आहार ‘ या विषयावर व्याख्यान..
मुंबई विद्यापीठ विद्यार्थी कल्याण विभाग आणि दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या सभागृहामध्ये महिला विकास कक्षा अंतर्गत दि. १७ ऑगस्ट २०२२ रोजी
‘ मानवी आरोग्य आणि योग्य आहार ‘ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला विकास कक्ष समन्वयक प्रा. प्रियांका साळवी यांनी केले. याप्रसंगी प्रमुख वक्त्या तन्ना शेख यांनी विद्यार्थ्यांना विशेषत: स्त्रीयांच्या आरोग्या विषयी सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली समिती समन्वयक प्रा. नंदा जगताप, प्रा. ज्योती दिंडे, प्रा. नेत्रांजली महाडिक नम्रता गांधी प्रा.श्रद्धा खुपटे, प्रा.अमृता मोहिते यांनी विशेष मेहेनत घेतली.