भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
दापोली येथील दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित, दापोली अर्बन बॅंक सिनीअर सायन्स कॉलेजच्या मैदानात कोविडचे सर्व नियम पाळून सुरक्षित अंतर राखत १५ ऑगस्ट २०२१ रोजी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी राष्ट्रगीत गायन करुन प्रभारी प्राचार्य डॉ. रघुनाथ घालमे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
ध्वजवंदना नंतर महाविद्यालयाच्या सभागृहात डॉ. रघुनाथ घालमे यांचे बीजभाषण झाले. यामध्ये त्यांनी उपस्थितांना भारताच्या ७५ व्या स्वतंत्र दिनाचे महत्त्व समजाविले. याप्रसंगी सभागृहात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.