प्रा.श्रद्धा देवानंद खुपटे यांना पुण्याच्या एसएनडीटी महिला विद्यापीठाची पीएच. डी. पदवी प्राप्त महिला उद्योजकांच्या लघुउद्योगांमधील वित्तीय व्यवस्थापन या विषयावर पीएच.डी.
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजच्या वाणिज्य विभागाच्या प्राध्यापिका श्रद्धा देवानंद खुपटे यांनी एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या पुणे उप केंद्राच्या संशोधन केंद्रातून ‘रत्नागिरी जिल्ह्यातील महिला उद्योजकांच्या लघुउद्योगांमधील वित्तीय व्यवस्थापन’ या विषयावर पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. हे संशोधन त्यांनी एसएनडीटी कॉलेजच्या माजी प्राचार्या डॉ. माधवी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
या अभ्यासातून, महिला उद्योजकांना आर्थिक नियोजन, खर्च नियंत्रण, कर्ज मिळवण्याची प्रक्रिया, गुंतवणुकीचे धोके व संधी, तसेच वित्तीय साक्षरता या विविध पैलूंवर सखोल विश्लेषण करण्यात आले आहे. अध्ययनानुसार, योग्य मार्गदर्शन आणि सरकार व स्थानिक संस्थांकडून मिळणारी साथ हे उद्योजकत्व वाढविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे असे दिसून आले.
दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे, उपप्राचार्य डॉ. घनश्याम साठे, वाणिज्य विभागाच्या प्रमुख डॉ. ज्योती चोगले-दिंडे यांसह सर्व शिक्षकवर्ग यांनी प्रा. खुपटे यांच्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन केले आहे. तसेच, हा अभ्यास महिला उद्योजकत्वाला प्रोत्साहन देण्यास आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला सबल बनविण्यासाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

