निसर्ग उपचार पद्धती – विषयावर मार्गदर्शन पर व्याख्यान संपन्न …
दापोली शिक्षण संस्था संचलित दापोली अर्बन बॅंक सिनिअर सायन्स कॉलेजमध्ये ‘निसर्ग उपचार पद्धती’ या विषयावर आरोग्य सल्लागार श्री. आनंद गाढवे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान दिनांक 8 जुलै 2021 रोजी पार पडले.
महाविद्यालयाच्या स्टाफ अँड स्टूडंट वेलफेअर कमिटीच्या (शिक्षक आणि विद्यार्थी कल्याण कमिटीच्या) वतीने आयोजित केलेल्या या व्याख्यानातून सहज-सोप्या पद्धतीने आरोग्याचा सांभाळ कसा करावा, याविषयी श्रोत्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका सिद्धी साळगावकर यांनी तर आभार-प्रदर्शन प्राध्यापिका प्रिया करमरकर यांनी केले.