‘ देशपातळीवरील आय. आय. टी. जॅम स्पर्धा परिक्षा – २०२२ ‘ मध्ये दापोली अर्बन बॅंक सिनियर सायन्स कॉलेजचे विद्यार्थी अव्वल
देशपातळीवरील सर्व विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी ‘आय. आय.टी. जॉईंट डमीशनटेस्टफॉर एम.एस.सी. ‘ ही स्पर्धा परिक्षा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धा परिक्षेच्या गुणवत्तायादी मध्ये
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली येथील दापोली अर्बन बॅंक सिनियर सायन्स कॉलेजच्या रसायनशास्त्र विभागातील कु. चिन्मय उमेश वैशंपायन या विद्यार्थ्याने (A.I.R.) ६६३ वा क्रमांक आणि भौतिक शास्त्र विभागातील कु. परिक्षित चंद्रशेखर पाखरे या विद्यार्थ्याने (A.I.R.) ९५४ वा क्रमांक प्राप्त करुन महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केलेले आहे.
सदर स्पर्धा परिक्षेमध्ये उत्तम गुणवत्ताप्राप्त करण्यासाठी यशस्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांचे उत्स्फूर्त प्रोत्साहन मिळालेले असुन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. घन:श्याम साठे आणि भौतिक शास्त्र विभाग प्रमुख प्रा. दिगंबर कुलकर्णी तसेच
महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले.या प्रसंगी संस्थेचे कार्यवाह डॉ. प्रसाद करमरकर व महाविद्यालयाच्या आय.क्यु. ए. सी. समिती मधील संस्थेचे प्रतिनिधी श्री. सौरभ बोडस यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले असुन त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी मन:पुर्वक शुभेच्छा दिलेल्या आहेत.