दापोली लाईफ लाईन आपत्ती व्यवस्थापन संघाचे १५ जुन रोजी पंचनदी येथे ५ वे प्रशिक्षण शिबीर पारपडणार.
दापोलीतील ‘ आंबेनळी घाटातील दुर्घटनेतुन ‘ प्रेरीतहोऊन दापोली एज्युकेशन सोसायटी आणि दापोली लाईफलाईन यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘ दापोली लाईफलाईन – आपत्ती व्यवस्थापन संघ’ मागील वर्षी यशस्वीरित्या स्थापित होऊन त्यास ९ महिने पुर्ण झालेले आहे.
या संघात दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमधील एकूण ४५ विद्यार्थी व नागरिक असुन या प्रशिक्षण शिबीरात २० निवडक व्यक्तींचा समावेश आहे.
दापोली लाईफलाइन चे प्रमुख श्री. अविनाश मयेकर हे प्रमुख समन्वयक असुन -‘ अपघाग्रस्त व्यक्तीं नानागरिकांकडुनच योग्य वेळी उपयुक्त मदत मिळावी व त्यासाठी तरुणांमधुनच सक्षम व्यक्ती घडवावेत ‘ , हा या आपत्तीव्यवस्थापनसंघाचा मुख्य हेतु आहे.
या संघाचे हे ५ वे रोमांचकारी प्रशिक्षण शिबीर लवकरच पंचनदी येथे १५ जुन व १६ जुन २०१९ रोजी पार पडणार असुन
या मध्ये रॅपलिंग, क्लाईंबिंग , रिव्हरक्रॉसिंग तसेच अपघात व्यक्तीस योग्य रित्याहाताळणे यासबंधित सर्व प्रात्यक्षिकेसह्याद्री ट्रेकर्स चे प्रमुख संजय पारठे यांच्या मार्गदर्शना खाली होणार आहेत.