दापोली – दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांची सभा उत्साहात पार पडली.
यावेळी प्राचार्य डॉ.संदेश जगदाळे,उपप्राचार्य डॉ. घनश्याम साठे,वाणिज्य विभागाच्या प्रमुख प्रा.ज्योती चोगले,प्रा.श्रद्धा खुपटे,प्रा. रुजुता जोशी,प्रा.सिद्धी साळगावकर,प्रा.ऋचा दळवी, प्रा.दिपाली नागवेकर,प्रा.जुवेरिया अराई,प्रा.फौजिया चिपळूणकर आदी उपस्थित होते.पालक प्रतिनिधी मधून जावेद सारंग,उदय दामले आणि बाळू भळगट यांनी विद्यार्थ्यांविषयी आणि कॉलेजविषयी अनेक चांगले मुद्दे मांडले.आणि अतिशय छान सूचना केल्या,ज्या महाविद्यालयाच्या विकासाच्या दष्टीने महत्त्वाच्या आहेत.तसेच सांस्कृतिक विभागांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांमार्फत सत्कार करण्यात आला.
अश्याप्रकारे पालक शिक्षक सभा अतिशय खेळीमेळीत पार पडली.