दापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेज मध्ये इंदिरा गांधी जयंती उत्साहात संपन्न…!
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित, दापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेजच्या ग्रंथालया मध्ये दि. १९ नोव्हेंबर २०२१ रोजी डि. एल. एल. ई. विभागातर्फे इंदिरा गांधी आणि गुरुनानक यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यातआली. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले कॉलेजचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी प्रतिमेला पुष्पहारअर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात केली.
या प्रसंगी ग्रंथपाल श्रीमती किर्ती परचुरे यांनी ओघवत्या भाषण शैलीत इंदिरा गांधीयांच्या भारतीय राजकारणातील योगदान व त्यांच्या जीवनचरित्रा विषयी उद्बोधक माहिती कथन केली. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सुजीत टेमकर यांनी केले.