दापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेज मध्ये सरदारवल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी
सरदारवल्लभभाई पटेल यांनी गुजरातच्या खेडा,आणंद जिल्ह्यातील बोरसद आणि सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचारा विरुद्ध सत्याग्रह केला. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यां मध्ये होऊ लागली. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे ते एक महत्त्वाचे नेते होते. तसेच भारत छोडो आंदोलनात तेही आघाडीवर राहिले. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी व भारताच्या राजकीय एक संघीकरणात मोठे योगदान दिले. तसेच फाळणी नंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांती स्थापने करीताही कार्य केले.
सरदारांनी हिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वायत्तसंस्थानांचे भारतात विलीनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होते म्हणुनच ते भारताचे लोहपुरुष ओळखले जातात.
या प्रभावी व्यक्तित्वाची जयंती दापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेजच्या ग्रंथालयात डि.एल. एल. ई. विभागातर्फे दि. ३१ऑक्टोबर रोजी उत्साहा साजरी करण्यातआली.
सर्व प्रथम कॉलेजचे प्राचार्यडॉ. संदेश जगदाळे यांनी प्रतिमेचे पुजन केले. त्यानंतर प्रा.अनिरुद्ध सुतार यांनीआपल्याओघवत्या भाषण शैलीत सरदारवल्लभभाई पटेल यांच्या व्यक्तीत्वाची उपस्थितांना ओळख करुन दिली.या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सुजित टेमकर यांनी केले.