दापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेज मधील ९५ टक्के विद्यार्थ्यांचे कोविड लसीकरण संपन्न-
महाराष्ट्र शासन आदेशानुसार २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२१ या काळात ‘ मिशनयुवास्वास्थ ‘ अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कोविड लसीकरणाची विशेष मोहिम दापोली येथील दापोली एज्युकेशन सोसायटीसंचालित दापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेज द्वारे राबविण्यात आली. या मोहिमे द्वारेअल्पकाळातच महाविद्यालयातील ९५% विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात महाविद्यालयास यश आले असुन उर्वरित विद्यार्थ्यांचे लवकरच लसीकरणव्हावे या साठी महाविद्यालय कार्यरत आहे.
या कोविडलसीकरणाच्या मोहिमेने विद्यार्थ्यांसोबतच अधिकांश नागरिकदेखील प्रेरित व्हावे, या साठी दि. ३० ऑक्टोबर २०२१ रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ‘ मिशनयुवास्वास्थ ‘ अंतर्गत आयोजित कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ‘ कोविडलसीकरणा मध्ये आपले संपुर्ण योगदान देऊन सर्वांना लसीकरणासाठी प्रेरितकरण्याची ‘ शपथ घेतली. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र मोरे व प्रा. अजिंक्य मुलुख यांनी विशेष मेहेनत घेतली.