दापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेजमध्ये ‘ वेबिनार आयोजन, नियोजन आणि तांत्रिक बाजू ‘ याविषयी एकदिवशीय मार्गदर्शनपर कार्यशाळा उत्साहात संपन्न .
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेजच्या IQAC विभागा मार्फत दि. २७ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ ते दुपारी ५ या वेळेत महाविद्यालयाच्या सभागृहात ‘ वेबिनार आयोजन, नियोजन आणि तांत्रिक बाजू’ याविषयी एकदिवशीय मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी IQAC विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. रघुनाथ घालमे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत कार्यशाळेचे प्रास्ताविक करुन उपस्थितांचे स्वागत केले.
तदनंतर प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी आपल्या उद्धाटनीय भाषणातून IQAC विभागाच्या सक्रिय प्रयत्नांविषयी कौतुक व्यक्त करुन कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.
कोवीड -१९ च्या पार्श्वभूमीवर शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल झालेला असल्याने प्राध्यापकांना ऑनलाईन पद्धतीशी जुळवून घेत वेबिनारच्या माध्यमातून उत्तम रितीने विद्यार्थी व शिक्षकांना प्रशिक्षित करता यावे, या सुहेतुने ही कार्यशाळा कॉलेजमधील सर्व प्राध्यापकांसाठी आयोजित करण्यात आली होती.
याप्रसंगी कार्यशाळेमध्ये मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयातील संगणकशास्त्रविभाग प्रमुख प्रा. सदानंद डोंगरे उपस्थित होते.
सदर कार्यशाळा चार सत्रांत आयोजित करण्यात आली.
प्रथम सत्रात प्रा. सदानंद डोंगरे यांनी वेबिनारसाठी ब्रोशर बनविणे , गुगल रेजिस्ट्रेशन फॉर्म तयार करणे, सभा घेण्यासाठी गुगल मीटचा वापर, व्हॉटस ॲप व टेलिग्राम अशा सोशल मिडीयाचा उपयोग, वेबिनारसाठी युट्युब चॅनल तयार करणे यांच्याविषयी सखोल संवाद साधून वेबिनारच्या पुर्वतयारीबद्दल उपस्थितांना मार्गदर्शित केले.
तर द्वितीय सत्रामध्ये ‘ वेबिनार घेत असताना गुगल मीटचा वापर कसा करावा, वेबिनार युटुब वर लाईव्ह कसे दाखवावे, तसेच ‘वेबिनारचा अभिप्राय कळण्यासाठी फॉर्म कसा तयार करावा ‘, याविषयी प्राध्यापकांना तात्विक माहिती देऊन प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून त्यांच्या शंकांचे निरसन केले. तृतीय सत्रात प्रा. सदानंद डोंगरे यांनी उपस्थितांना
‘ ई प्रशस्तिपत्रक कसे तयार करावे ‘, याचे प्रात्यक्षिक दाखविले तर चौथ्या सत्रात उपस्थित प्राध्यापकांकडून विविध प्रात्यक्षिके करुन घेण्यात आली.
कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी सर्व शिक्षकांच्यावतीने प्रा. संतोष मराठे यांनी कार्यशाळेच्या यशस्वीतेबद्द्ल अभिप्राय कथन केला आणि सुत्रसंचालक व IQAC चे उप-समन्वयक प्रा. कैलास गांधी यांनी IQAC विभागातर्फे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे, उपप्राचार्य डॉ.घनश्याम साठे आणि प्रमुख व्याख्याते व मार्गदर्शक प्रा. सदानंद डोंगरे व सहभागी सर्व प्राध्यापकांविषयी आभार प्रदर्शित केले.