दापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेज मध्ये यशवंतराव चव्हाण यांची जयंती उत्साहात संपन्न…!
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित, दापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेजच्या ग्रंथालया मध्ये दि. २२ फेब्रुवारी २०२२ रोजी डि. एल. एल. ई. विभागातर्फे
‘यशवंतराव चव्हाण ‘ यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले कॉलेजचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात केली.
या प्रसंगी प्रा. श्राव्या पवार यांनी आपल्या ओघवत्या भाषण शैलीतुन यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरक व्यक्ती मत्वाची ओळख उपस्थितांना करुन दिली.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते आणि कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. गंगा गोरे यांनी केले.