दापोली अर्बन बॅंक सिनियर सायन्स कॉलेजमार्फत ‘ रिसेंट ट्रेन्डस इन लाईफ सायन्स, एनर्जी ॲंड एन्व्हायरमेंट ‘ या विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय परिषदचे आयोजन.
दापोली/ दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बॅंक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये दि. २४ व २५ सप्टेंबर २०२१ रोजी ‘ रिसेंट ट्रेन्डस इन लाईफ सायन्स, एनर्जी ॲंड एन्व्हायरमेंट’ या विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केलेले आहे.
वैज्ञानिक संशोधनास चालना मिळावी, या हेतूने या राष्ट्रीय परिषदेतून ‘जीवशास्त्र, ऊर्जा व पर्यावरणातील विविध नवीन संकल्पनांविषयी ‘ उपस्थितांना मार्गदर्शन मिळणार आहे.
याप्रसंगी या राष्ट्रीय परिषदेस कोकण विभागाचे सहसंचालक डॉ. संजय जगताप, डॉ. एन. जे. पवार, डॉ. श्रीरंग यादव, श्रीयुत किशोर शितोळे, डॉ. शैलेश वाघमारे, डॉ. इ. के. नरेश्वर, डॉ. प्रदीप सरवदे, डॉ. प्रविण पंड्या इ. निपुण व तज्ञ व्याख्याते मार्गदर्शक म्हणून लाभणार आहेत.
दापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेजच्यावतीने प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे व आयोजन समितीचे सचिव डॉ. बापू यमगर यांनी ‘ अधिकाधिक संख्येने विद्यार्थी, प्राध्यापक व उद्योजकांस या राष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्याचे ‘ आवाहन केले आहे.