दापोली अर्बन बॅंक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये ‘ सायबर सिक्युरीटीवर ‘ उद्बोधक व्याख्यान आयोजित
आजकाल मोबाईल स्मार्ट आहे, टी.व्ही. स्मार्ट होत आहेत, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस स्मार्ट होत आहेत पण माणूस स्मार्ट होत आहे का ? तर नाही. कारण आज सुद्धा ओटीपी मागून खात्यातले पैसे काढण्याचे प्रकार होत असतात. हनी ट्रॅप अथवा चारित्र्य हनन द्वारे ब्लॅकमेलिंगच्या अनेक घटना घडत आहेत.
याच अनुषंगाने रत्नागिरी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ आजादी का अमृत महोत्सव’ उपक्रमा अंतर्गत दापोली पोलीस ठाणे यांच्या वतीने सायबर क्राईम जनजागृतीसाठी दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बॅंक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये ‘ सायबर सिक्युरीटीवर ‘ या विषयावर उद्बोधक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रमुख व्याख्याते पी.एस.आय एन. एम.कांबळे यांनी सायबर क्राईमच्या अनेक घटना सांगुन कोणत्या बाबतीत सतर्क रहावे, सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक कसा करावा याविषयी उपस्थित बहुसंख्य विद्यार्थ्यांस सखोल मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास सुहास पाटील यांची सन्माननीय उपस्थिती लाभली.
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. शंतनु कदम आणि इतर सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहेनत घेतली.
याप्रसंगी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. तेजस मेहता यांनी केले.