दापोली अर्बन बॅंक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये लोकमान्य टिळक यांची जयंती उत्साहात साजरी.
दापोली येथील दापोली अर्बन बॅंक सिनियर सायन्स कॉलेजच्या ग्रंथालयात २३ जुलै २०२२ रोजी लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी प्रतिमेचे पुजन केले. याप्रसंगी विद्यार्थिनी मेहेक पठाण आणि प्रा. संतोष मराठे यांनी आपल्या भाषणातुन लो. टिळकांच्या पुण्य स्मृतीस उजाळा दिला. लोकमान्य टिळकांचे अष्टपैलु व्यक्तीमत्त्व आणि पांडित्याची जाण त्यामुळे उपस्थितांना झाली.
याप्रसंगी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. विश्वेष जोशी यांनी केले.