दापोली अर्बन बॅंक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी
महाराष्ट्राला थोर समाजसुधारक, विचारवंत, कवी, संत, साहित्यिक अशी परंपरा लाभली आहे. लोकमान्य टिळक, वि.दा. सावरकर, संत तुकाराम अशी अनेक रत्ने आपल्या महाराष्ट्रात जन्माला आली आहेत. यांतील प्रत्येकाने आपली वेगळी अशी ओळख निर्माण केलेली आहे. परंतु अशी कुठली व्यक्ती आहे जी या सर्व उपाध्या धारण करू शकते? कुठली एक अशी व्यक्ती आहे जिने या सर्व क्षेत्रांत आपले अमूल्य योगदान दिले आहे? या प्रश्नाचे एकमेव उत्तर म्हणजे अण्णाभाऊ साठे.
लोकशाहीर म्हटलं कि सुरुवातीला आठवणारं नाव म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे.
समाजाला एक नवी दिशा देण्याचे कार्य त्यांच्या साहित्यातून घडले. उपेक्षित समाजातील जनमानसाचा आवाज उठवण्याचे काम त्यांच्या लेखनीतून झाले. आपल्या अजरामर साहित्यिक कृतीतून त्यांनी महाराष्ट्रात परिवर्तन घडवून आणले
दापोली अर्बन बॅंक सिनियर सायन्स कॉलेजच्या ग्रंथालयात डि.एल. एल. ई. विभागातर्फे लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी आय. क्यु. ए. सी समन्वयक डॉ. रघुनाथ घालमे यांनी प्रतिमेचे पुजन केले. तदनंतर दिव्या केळकर या विद्यार्थीनीने आपल्या ओघवत्या भाषणशैलीत अण्णाभाऊ साठे यांची पुण्यस्मृतीस उजाळा दिला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. विश्वेश जोशी यांनी केले.