दापोली अर्बन बॅंक सिनियर सायन्स कॉलेज मध्ये महाकवी कालिदास दिना निमित्त ‘ मराठी मेळावा ‘
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बॅंक सिनियर सायन्स महाविद्यालयाच्या सभागृहात १ जुन २०२२ रोजी मराठी वाङमय मंडळातर्फे
कालिदास दिना निमित्त ‘ मराठी मेळाव्याचे ‘ आयोजन करण्यात आले.
या मराठी मेळाव्यात श्रुतलेखन, भाषांतर आणि रॅपिड फायर या पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सानिका ओक व सोनल शिंदे तर द्वितीय क्रमांक सई सावंत व शुभम लोवरे यांनी पटकाविला.
या मराठी मेळाव्यात महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी सहभागी झाले असून सदर कार्यक्रमासाठी कॉलेजचे प्राचार्य डॉ.संदेश जगदाळे, व उपप्राचार्य डॉ. श्री. घन:श्याम साठे यांचे मार्गदर्शन लाभले.
मराठी वाङमय मंडळाशी संलग्न प्रा. ऋजुता जोशी. आणि प्रा. सिद्धी साळगावकर तसेच वाणिज्य विभागाच्या ॲडमिन समितीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहेनत घेतली.