दापोली अर्बन बॅंक सिनियर सायन्स कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बॅंक सिनियर सायन्स कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांची विविध नामवंत संस्थांमध्ये डॉक्टरे आणि पद्व्युतर अभ्यासक्रमासाठी निवड झालेली असुन महाविद्यालयासाठी ही कौतुकास्पद बाब ठरलेली आहे.
यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कु. चिन्मय वैशंपायन या विद्यार्थ्याची थिरुअनंतपुरम येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन रिसर्च येथे पी. एच. डी. अभ्यासक्रम – रसायनशास्त्र या विषयासाठी निवड झालेली आहे. तर कु.परिक्षित पाखरे या विद्यार्थ्याची जोधपुर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मध्ये आणि अथर्व महाजन या विद्यार्थ्याची वेल्लोर येथील वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी येथे
एम. एस. सी. अभ्यासक्रम – भौतिकशास्त्र या विषयासाठी निवड झालेली आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांस महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले असुन याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. केदार साठे, कार्यवाह डॉ. प्रसाद करमरकर तसेच कॉलेजचे प्राचार्य डॉ.संदेश जगदाळे, उपप्राचार्य डॉ. घम:शाम साठे आणि भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. दिगंबर कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबाबत कौतुक व्यक्त केले असुन त्यांच्या पुढील उज्ज्वल भविष्या साठी मन:पुर्वक शुभेच्छा दिलेल्या आहेत.