दापोली अर्बन बॅंक सिनियर सायन्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सुवर्ण कामगिरी
दापोली अर्बन बॅंक सिनियर सायन्स महाविद्यालयातील आय.क्यु. ए. सी. विभाग आणि ठाकुर श्यामनारायण डिग्री कॉलेज सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ ७५व्या अमृत महोत्सव ‘ या उपक्रमा अंतर्गत विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन विद्यापीठ स्तरावर करण्यात आले होते.
या स्पर्धांमध्ये दापोली अर्बन सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ८ पैकी ७ स्पर्धांमध्ये अव्वल येत सुवर्ण व रौप्य पदकाची कमाई केलेली आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये कथालेखन स्पर्धेत अलिझा परकार, मातीकाम स्पर्धेत हृतिक संकुळकर यांनी प्रथम क्रमांक, तर वक्तृत्व स्पर्धेसाठी रिफत रखांगे, सुगम संगीत स्पर्धेत गौरी खरे, कोलाज स्पर्धेत आकांक्षा अस्वले, स्पॉट फोटोग्राफी प्रकारात विशाल भागवत यांनी द्वितीय क्रमांक मिळवीत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मन:पुर्वक अभिनंदन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे, अभ्यासेतर उपक्रमांचे प्रमुख प्रा. संतोष मराठे, क्रमिक अभ्यासक्रम विभागाचे प्रमुख प्रा. कैलास गांधी यांनी केले असुन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. प्रियांका साळवी, प्रा. अजिंक्य मुलुख, प्रा. विश्वेश जोशी, प्रा. श्रुती आवळे, प्रा. अनिरुद्ध सुतार, प्रा. स्वाती देपोलकर, प्रा. ऋजुता जोशी प्रा. नेहा मुंडेकर, प्रा श्राव्या पवार यांचे विद्यार्थ्यांस विशेष मार्गदर्शन लाभले.