दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजमध्ये तायक्वांदो प्रशिक्षणातून स्वसंरक्षणाचे धडे
दिनांक 30 व 31 ऑगस्ट 2019 रोजी दापोली अर्बन बँक सिनीयर सायन्स कॉलेजमध्ये विद्यार्थिनींसाठी आरोग्य आणि तायक्वांदो प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. महिला विकास कक्ष समितीद्वारे घेण्यात आलेली ही कार्यशाळा दोन टप्प्यात पार पडली. प्रथम दिवशी डॉ. माधुरी साठे यांनी
आरोग्य विषयी सखोल चर्चा विद्यार्थिनींशी केली. स्त्रियांचे आरोग्य , दिनचर्या यांविषयी विशेष माहिती त्यांनी याप्रसंगी दिली. कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी तायक्वांदो मधील ब्लॅकबेल्ट प्राप्त राष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या प्राजक्ता माने यांनी सहाय्यक विद्यार्थी कु. आकाश भंडारी यांच्या मदतीने स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले. समोरील व्यक्तीने हत्यारांचा वापर केल्यास , अचानक हल्ला केल्यास कशा पद्धतीने मुली स्वतःचे रक्षण करू शकतील याची विविध तायक्वांदोमधील कौशल्ये त्यांनी याप्रसंगी दाखवली. विद्यार्थिनींकडून ही प्रात्यक्षिके प्रत्यक्ष करून घेण्यात आली. या कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी समिती प्रमुख ज्योती चौगुले आणि शिक्षक वर्ग यांनी प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी प्रयत्न केले.