दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स महाविद्यालयामध्ये ‘ सामुहिक राष्ट्रगीत गायन ‘.
दापोली येथील दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने
दि. ९ ऑगस्ट २०२२ रोजी स्वराज्य महोत्सव अंतर्गत ‘ सामुहिक राष्ट्रगीत गायन ‘करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी उत्सफुर्तपणे सहभागी झाले होते.
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी हर घर तिरंगा उपक्रम समन्वयक प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे आणि आयोजन समन्वयक प्रा. संतोष मराठे यांच्या मार्गदर्शनाने डॉ. गंगा गोरे,अनिकेत नांदिस्कर , श्राव्या पवार सुजीत टेमकर निशिगंधा बंदरकर यांनी विशेष मेहेनत घेतली.