दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेज मध्ये पद्मभूषण आणि पद्मविभूषण प्राप्त व्यक्तींवर माहिती पट
दापोली येथील दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित
दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेज मध्ये २८ फेब्रुवारी २०२२ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागातर्फे पद्मभूषण आणि पद्मविभूषण प्राप्त व्यक्तींच्या जीवन प्रवासावर आधारित माहिती पट दाखवण्यात आला.
या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. घन:श्याम साठे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक भौतिक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. दिगंबर कुलकर्णी यांनी केले. या माहितीपटातद्वारे उपस्थित विद्यार्थ्यांना सी. व्ही. रमण, एच. सी. वर्मा, सुयोज गुहा, वरिष्ठ नारायण सिंह, संघमित्र बंडो पाध्याय, डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम इत्यादी शास्त्रज्ञांची माहिती देण्यात आली.
सदर माहितीपटाच्या सादरीकरणासाठी श्रेयस उसगावकर, दिव्या केळकर, उझ्मा मुंगरुसकर, मुस्कान लोखंडे, स्नेहा शिगवण, साक्षी आंबेकर, कृतार्थ बोडस, शिवतेज पाटील, अल्फिया अक्बानी, सेजल मोहिते, बुशरा बुरोंडकर, स्नेहा शेट्टी, नुपूर रेवाळे, मिस्बा खल्फे
अल्फिया ममतुले, सुमैया पेचकर, सामया पेचकर, तहुरा परकार, ओवेस मुजावर या विद्यार्थ्यानी विशेष मेहनत घेतली.
तसेच सदर माहितीपटाच्या नियोजनासाठी भौतिकशास्त्र विभागातील प्रा. विश्वेश जोशी, प्रा. अनिकेत नांदिस्कर
यां नाभौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. दिगंबर कुलकर्णी यांचे मोलाचे मार्ग दर्शन लाभले.