दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेज मध्ये आरोग्य तपासणी शिबीर
८ मार्च २०२२ रोजी ‘ जागतिक महिला दिनाचे ‘ औचित्य साधून दापोली दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बॅंक सिनियर सायन्स कॉलेजच्या महिला विकास कक्ष विभाग, रोटरी क्लब, दापोली आणि होमिओपॅथिक कॉलेज, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमतीनसत्रांत पार पडला असुन या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून होमिओपॅथी कॉलेज, दापोली येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत डॉ. मानसी जतकर उपस्थिती लाभली.
‘ जागतिक महिला दिन नेहमीच साजरा व्हावा ‘, असे व्यक्त करीत डॉ. मानसी जतकर यांनी विद्यार्थ्यांना ‘महिला आरोग्य’ या विषयी संबोधित केले.
या कार्यक्रमा मध्ये महिला विकास कक्षाच्या समन्वयक प्रा. ज्योती चौगले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून उपस्थितांना मान्यवरांची ओळख करून दिली. तर रोटरी क्लब चे सदस्य अजय कानडे यांनी रोटरी क्लब च्या सामाजिक कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना समाज कार्यासाठी प्रोत्साहित केले.
या कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रा मध्ये होमियोपॅथिक कॉलेज मधील डॉक्टरांच्या सहकार्याने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनींची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी भूषवले.