दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न….
दापोली येथे ३१ मे २०२१ रोजी दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा वार्षिक पारितोषिक वितरण आणि बहर वार्षिकांक प्रकाशन सोहळा ऑनलाइन पद्धतीने उत्साहात पार पडला. या समारंभाचे अध्यक्षस्थान कॉलेजचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी भुषविले.
सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून दापोली एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्री. सौरभ बोडस यांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. घन:शाम साठे यांनी केले. तसेच याप्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. प्रियांका साळवी यांनी
वार्षिक अहवालाचे वाचन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. संतोष मराठे, प्रा. नंदा जगताप, प्रा. सदानंद डोंगरे, प्रा. शंतनु कदम , प्रा.अजिंक्य मुलुख, किर्ती परचुरे यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाची सांगता प्रा. अनिकेत नांदिस्कर यांनी केले असुन सुत्रसंचालन प्रा. प्रिया करमरकर यांनी केले.
या कार्यक्रमामध्ये कॉलेजच्या सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने ऑनलाईन पद्दधतीने उपस्थित राहुन आपला सहभाग दर्शवला.