• Home
  • Management
    • Board of Directors
    • Goals and Objectives
    • Sister Institutions
  • College
    • About College
    • Administration
    • CDC
    • Milestones
    • Committee
    • Prospectus
    • Awards and Recognition
    • Code of Conduct
    • Grievances and Redressal
  • Academics
    • Programme
    • Admission
    • Fee Structure
    • Departments
      • Commerce
      • Science
        • Chemistry
        • Botany
        • Zoology
        • Physics
        • Microbiology
        • Computer Science
        • Environmental Science
      • Foundation Course
    • Academic Calender
    • Bridge/Remedial Coaching
    • Master Time Table
    • Scholarships
    • Mentor-Mentee
    • Add-On Courses
  • Examination
  • IQAC
    • SSR
    • AQAR
    • Best Practices
  • Activities
    • Research
    • NSS
    • DLLE
    • Science Association
    • Cultural Activities
    • Placement Cell
    • Nature Club
    • Collaborations
    • Woman Development Cell
    • Post Graduate Student and Teaching Staff Research Forum
    • Sports
    • Competitive Examination Center
    • “Eureka” e-infoletter
  • Learning Resources
    • Library
    • Laboratories
    • Botanical Garden
  • Facilities
    • Infrastructure
    • Canteen
    • Ladies Hostel
    • Gymkhana
    • ICT Facilities
  • Alumni
    • Alumni Committee
    • Alumni Contact
  • Contact
Have any question?
(+91) 7709252933
[email protected]
Dapoli Urban Bank Senior Science College
  • Home
  • Management
    • Board of Directors
    • Goals and Objectives
    • Sister Institutions
  • College
    • About College
    • Administration
    • CDC
    • Milestones
    • Committee
    • Prospectus
    • Awards and Recognition
    • Code of Conduct
    • Grievances and Redressal
  • Academics
    • Programme
    • Admission
    • Fee Structure
    • Departments
      • Commerce
      • Science
        • Chemistry
        • Botany
        • Zoology
        • Physics
        • Microbiology
        • Computer Science
        • Environmental Science
      • Foundation Course
    • Academic Calender
    • Bridge/Remedial Coaching
    • Master Time Table
    • Scholarships
    • Mentor-Mentee
    • Add-On Courses
  • Examination
  • IQAC
    • SSR
    • AQAR
    • Best Practices
  • Activities
    • Research
    • NSS
    • DLLE
    • Science Association
    • Cultural Activities
    • Placement Cell
    • Nature Club
    • Collaborations
    • Woman Development Cell
    • Post Graduate Student and Teaching Staff Research Forum
    • Sports
    • Competitive Examination Center
    • “Eureka” e-infoletter
  • Learning Resources
    • Library
    • Laboratories
    • Botanical Garden
  • Facilities
    • Infrastructure
    • Canteen
    • Ladies Hostel
    • Gymkhana
    • ICT Facilities
  • Alumni
    • Alumni Committee
    • Alumni Contact
  • Contact

News

  • Home
  • Blog
  • News
  • दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजमध्ये दोन दिवसीय ऑनलाइन आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न

दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजमध्ये दोन दिवसीय ऑनलाइन आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न

  • Categories News
  • Date April 13, 2026

दापोली एज्युकेशन सोसायटीच्या दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाच्या वनस्पती शास्त्र विभाग आणि IQAC यांनी वनस्पती शास्त्र विषयातील संशोधन आणि नवकल्पनांना चालना देण्यासाठी “रिसर्च इंटरवेंशन्स अँड अँडव्हान्समेंट इन प्लांट सायन्सेस या विषयावर दोन दिवसीय ऑनलाइन आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली.

७ आणि ८ एप्रिल २०२६ रोजी यशस्वीपणे संपन्न झालेल्या या परिषदेत देश-विदेशातील प्रख्यात शास्त्रज्ञ, संशोधक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या आंतरराष्ट्रीय परिषदेचे प्रास्ताविक वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. रघुनाथ घालमे यांनी केले. सर्वांचे स्वागत कॉलेजचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी केले. ‘या परिषदेमुळे वनस्पतीशास्त्र विषयातील नव्या संधी निर्माण होऊन संशोधनाला गती मिळेल, असा विश्वास त्यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केला.
कार्यक्रमाचे उद् घाटन व अब्स्ट्रॅक्ट बुकचे प्रकाशन दापोली एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा. डॉ. प्रसाद करमरकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमांमध्ये बोलत असताना त्यांनी दापोली एज्युकेशन सोसायटी व कॉलेजची प्रगती कशी झाली याची माहिती दिली. आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात हवामान बदल, जैवविविधता संवर्धन, अन्न सुरक्षा आणि शाश्वत विकास यांसारख्या आव्हानांवर मात करण्यासाठी वनस्पतीशास्त्र महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या क्षेत्रातील संशोधनामुळे कृषी, वैद्यकशास्त्र आणि पर्यावरण व्यवस्थापनात नवे शोध लागतात. त्यामुळे अशा आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन अत्यंत योग्य व गरजेचे आहे, असे मत डॉ. करमरकर यांनी व्यक्त केले. या प्रसंगी संस्थेचे सचिव मा. डॉ. विनोद जोशी उपस्थित होते.
उद् घाटन कार्यक्रमाचे मुख्य वक्ते जगप्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. एस. आर. यादव यांनी वनस्पती विविधतेचे संवर्धन आणि जैव-संशोधन यामध्ये शैक्षणिक संस्थांची भूमिका यांचे महत्त्व सांगितले.
या दोन दिवसांमध्ये एकूण दहा सत्र होती यामध्ये विविध ठिकाणच्या वनस्पती शास्त्रज्ञांची व्याख्याने झाली. यामध्ये डॉ. दिगंबर मोकाट, मुख्य अन्वेषक आणि प्रादेशिक संचालक, आयुष मंत्रालय; डॉ.मनिषा सांगळे युनायटेड किंगडम (यू. के.); डॉ. उषा मुकुंदन, महाराष्ट्र; श्रीलंकेच्या डॉ. महेंद्रनाथन, साऊथ कोरियाचे शास्त्रज्ञ डॉ. गजानन घोडके यांचा सहभाग होता. परिषदेदरम्यान वनस्पतीशास्त्र विषयातील नवीन संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरण, वनस्पती संवर्धन तसेच शाश्वत शेतीसंदर्भातील विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. विविध सत्रांच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.के.एन.धुमाळ, डॉ.वसंत माळी, डॉ.सुचेंद्र दत्ता, प्रा.डॉ.विनोद शिंपले, प्रा.राजेंद्र शिंदे, प्रा.अजित केंगार, डॉ. मीना राव, डॉ. प्रताप नायकवडे, डॉ. जे. एस. बागल आणि प्रा. बंडू कोंडे होते.
याबरोबर अठ्ठ्याऐंशी नवीन संशोधकांनी त्यांच्या संशोधनाचे मौखिक सादरीकरणे केले. यामध्ये अन्न सुरक्षा, हवामान लवचिकता, जैव-संसाधन व्यवस्थापन आणि जैवविविधता संवर्धनासाठी वनस्पतीशास्त्रीय संशोधनाचा उपयोग करण्याच्या निकडीवर प्रकाश टाकला. यामधून पाच संशोधकांना ‘सर्वोत्कृष्ट सादरकर्ता’ पुरस्काराने सन्मानित केले. त्यामध्ये के. आर्या, सेंट अलॉयसियस, मंगलोर; श्री. पी. पी. भालेकर, दापोली; गजानन तांबडे, देऊळगाव राजा; प्रशांत सगरे दापोली; प्रिया सेंट झेवियर्स कॉलेज मुंबई यांना सन्मानित केले. सर्व सत्रे अत्यंत माहितीपूर्ण, संवादात्मक, आणि नाविन्यपूर्ण होती. या परिषदेत इतर चार देशांमधून आणि भारतातील दहा वेगवेगळ्या राज्यांमधून एकूण २२० संशोधकांनी भाग घेतला.
समारोप समारंभाचे अध्यक्षस्थान दापोली एज्युकेशन संस्थेचे सदस्य मा. श्री. श्रेयस काकिर्डे यांनी भूषविले तर डॉ. के. एन. धुमाल हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. वनस्पतींचे संवर्धन ही काळाची गरज आहे परंतु त्यासाठी शास्त्रीय अभ्यासक व शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन त्याचे महत्व सर्वांना सांगितले पाहिजे. त्यासाठी अशा परिषद घेणे गरजेचे आहे असे वक्तव्य त्यांनी केले.
डॉ. रघुनाथ घालमे सरांनी पूर्ण दोन दिवसांचा आढावा समारोप समारंभामध्ये सादर केला. संपूर्ण कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन परिषदेचे सचिव डॉ. विक्रम मासाळ यांनी केले.
या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी आयोजक, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. रघुनाथ घालमे व डॉ. पूनम पानस्कर यांनी समन्वयक, डॉ. विक्रम मसाळ व डॉ. निवास देसाई यांनी सचिव व प्रा. दिपाली नागवेकर व प्रा. अजिंक्य मुलुख यांनी खजिनदार म्हणून काम पाहिले.
या परिषदेसाठी दापोली एज्युकेशन संस्थेचे व कॉलेजच्या सर्व शिक्षकांचे सर्वतोपरी मार्गदर्शन व मदत मिळाली.
संगणक शास्त्राचे विभाग प्रमुख श्री सदानंद डोंगरे व श्री स्वप्निल साळवी यांनी कार्यक्रमाचा डिजिटल प्लॅटफॉर्म अत्यंत कार्यक्षमतेने व सुरळीत सांभाळला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन डॉ. निवास देसाई व प्रा. दिपाली नागवेकर यांनी केले.

  • Share:
Swapnil Salvi

Previous post

दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाला आय. एस. ओ. 9001: 2015 मानांकनाचे निरंतरता प्रमाणपत्र प्रदान
April 13, 2026

Search

Department

  • About Department
  • Faculty
  • Courses
  • PO, PSO & CO
  • Facilities
  • Research
  • Guest Faculty
  • Results
  • Achivements
  • Future Plans
  • Activities

Dapoli Urban Bank Senior Science College

(+91) 7709252933

[email protected]

Links

  • University of Mumbai
  • UGC
  • Maharashtra Govt.
  • Ministry of HRD
  • NAAC
  • RTI Declaration

Dapoli Urban Bank Senior Science College Dapoli site by VIKCON Consulting. Powered by WordPress.