दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजमध्ये आंतरमहाविद्यालयीन व आंतर विभागीय खो-खो स्पर्धा उत्साहात संपन्न…
दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजमध्ये विद्यापीठ मुंबई विद्यापीठ अंतर्गत
आंतरमहाविद्यालयीन व आंतर विभागीय महिला
खो-खो स्पर्धा दिनांक 4 नोव्हेंबर आणि 5 नोव्हेंबर रोजी दापोलीतील आझाद मैदान येथे उत्साहात पार
पडल्या. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉक्टर
अमृले , अध्यक्ष निवड चाचणीचे संचालक एस. पी. के. कॉलेज मधील श्री. चंद्रकांत नाईक आणि या
स्पर्धेचे नियोजक आणि झोन- 5 चे समन्वयक डॉ. विनोद शिंदे यांची उपस्थिती होती. महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांच्या हस्ते उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे आणि दापोली एज्युकेशन सोसायटीचे
सेक्रेटरी डॉ. प्रसाद करमरकर यांचे स्वागत करण्यात आले . आंतर महाविद्यालयीन महिला खो-खो
स्पर्धेमध्ये एकूण १३ संघ सहभागी झाले होते. सर्व संघांमध्ये स्पर्धेच्या प्रथम दिवशी चुरशीची लढत झाली
व त्यापैकी उपांत्य फेरीमध्ये किर्ती कॉलेज, मुंबई ; साठे कॉलेज , के. बी. पाटील , एस. एस. टी. कॉलेज,
उल्हासनगर या ४ संघांनी धडक मारली.
उपांत्य फेरीमध्ये किर्ती कॉलेज विरुद्ध साठे कॉलेज हा पहिला सामना मैदानावर रंगला यामध्ये किर्ती
कॉलेजच्या संघाने केवळ ७ गुणांनी साठे कॉलेजच्या संघावर यशस्वीपणे मात करीत अंतिम फेरीत आपले
स्थान निश्चित केले . या उपांत्य फेरीचा द्वितीय सामना के बी पाटील कॉलेज विरुद्ध एसएसटी कॉलेज
या दोन संघांमध्ये झाला. एस. एस. टी कॉलेजच्या संघाने केवळ १ गुणांच्या फरकाने के बी पाटील कॉलेज
विरुद्ध विजय प्राप्त केला. तृतीय क्रमांकासाठी के बी पाटील कॉलेज व साठे कॉलेज यांच्यामध्ये लढत
होऊन के. बी पाटील, वाशी हा संघ १ गुणांनी विजय झाला.
या स्पर्धेच्या द्वितीय दिवशी अंतिम लढत एस. एस टी कॉलेज विरुद्ध किर्ती कॉलेज अशी झाली यामध्ये
एस एस टी कॉलेजच्या संघ एक डाव दोन गुणांनी विषयी झाला. पारितोषिक वितरण समारंभामध्ये
चंद्रकांत नाईक यांच्या हस्ते द्वितीय क्रमांक प्राप्त किर्ती कॉलेजच्या संघास रजत पदक व पारितोषिक
देऊन गौरविण्यात आले. दापोली अर्बन बँक सिनीयर सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी
प्रथम क्रमांक प्राप्त एस एस टी कॉलेज , उल्हासनगर या संघास सुवर्णपदक व पारितोषिक दिले व
त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अशा रीतीने यशस्वीरीत्या आंतरमहाविद्यालयीन आंतर
विभागीय खो-खो स्पर्धा उत्साहात पार पडल्या.