दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजचे विशेष निवासी श्रम संस्कार शिबिर उत्साहात संपन्न..
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसांचे निवासी श्रमसंस्कार शिबिर दत्तक गाव निगडे येथे नुकतेच जिल्हा परिषद आदर्श शाळा, निगडे येथे उत्साहात पार पडले.
या शिबिराचे उद्घाटन मा. डॉ. दीपक हर्डीकर, सहयोगी प्राध्यापक, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दापोली एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त मा. समीर गांधी, प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे, उपप्राचार्य डॉ. घनश्याम साठे, विभागीय समन्वयक डॉ. संजय पाटोळे, सरपंच मा. श्री वसंत घरवे, श्री. संतोष रेवाळे, अध्यक्ष, खेमदेव विकास मंडळ आणि अनेक मान्यवर व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती. शिबिरात स्वयंसेवकांनी वनराई बंधारे बांधले. तसेच कागद काम कार्यशाळा, इंग्रजी संवाद कार्यशाळा, विज्ञान प्रदर्शन, रस्ते दुरुस्ती आणि स्वच्छता (माझी वसुंधरा व स्वच्छ भारत अभियान), परसबाग निर्मिती, शाळा परिसर रंगरंगोटी, सत्यनारायण पूजा व हळदी कुंकू, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी विविध उपक्रम राबविण्यात आले. या शिबिराचे नियोजन कार्यक्रम अधिकारी प्रा. अजिंक्य मुलुख आणि डॉ. मनोज लाड यांनी केले होते. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना समितीचे प्रा. अनिरुद्ध सुतार, प्रा. निशिगंधा बंदरकर, प्रा. नेत्रांजली महाडिक, डॉ. पुनम पानसकर, प्रा. शंतनू कदम, अनिकेत घोसाळकर, मंजुषा येडेकर तसेच विद्यार्थी प्रतिनिधी हितेश जैन, हर्षल हांडे, आयेशा खोत, जान्हवी साळगावकर व ओम साळवी यांनी विशेष मेहनत घेतली. शिबिरामध्ये विविध तज्ञांच्या व्याख्यानांचे आयोजन देखील करण्यात आले होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे रत्नागिरी जिल्हा सन्मवयक डॉ. राहुल मराठे यांनी शिबीरास भेट देऊन सर्व स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. तसेच दापोली एज्युकेशन सोसायटीचे संचालक माननीय श्री रवींद्र कालेकर यांनी भेट दिली व सर्व शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. प्रा. अजिंक्य मुलुख यांचे नॉट मी बट यु या विषयावर, प्रा. डॉ. राजेंद्र मोरे यांचे सेवाभावी संस्था आणि आपण या विषयावर व्याख्यान झाले. डॉ.सुदेश आयरे यांचे मिशन आॅफ लाईफ या विषयावर व्याख्यान झाले. प्रा.संतोष मराठे यांचे संवाद कौशल्य विषयावर व्याख्यान झाले. तसेच वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर दापोली या संस्थेचे सफर सर्प विश्वाची या विषयावर व्याख्यान झाले. प्रा.कैलास गांधी आणि प्रा.श्रेयस मेहंदळे यांनी घर कवितांचे या विषयावर विविध कवितांचे सादरीकरण केले. प्रा.दिगंबर कुलकर्णी यांनी या शिबिरात योगा मार्गदर्शन केले.
शिबिराचा समारोप कार्यक्रम प्रमुख पाहुणे दापोली एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ.प्रसाद करमरकर, ट्रस्टी आनंद करमरकर, प्राचार्य डॉ.संदेश जगदाळे यांच्या उपस्थितीत पार पडला.