दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजमध्ये ‘संपत्ती निर्मितीसाठी फिनांशियल मार्केट’ या विषयावर एकदिवसीय सेमिनार संपन्न.
दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘संपत्ती निर्मितीसाठी फिनांशिअल मार्केट’ (Applied study of financial markets for wealth generation) या विषयावर एकदिवसीय सेमिनार आयोजित करण्यात आला. या एकदिवसीय सेमिनारसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सांगली येथील वित्तीय विश्लेषक मा.श्री.सुनील जाधव हे उपस्थित होते. भारतामधील नागरिकांची सध्याची आर्थिक साक्षरता लक्षात घेऊन कराव्या लागणाऱ्या आर्थिक नियोजनाबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आर्थिक साक्षरता तसेच शेअर मार्केट, एसआयपी, वित्तीय ठेवीचे नियोजन, पॅन कार्ड घेण्याचे फायदे यासंबंधी मार्गदर्शन करताना त्यांनी, प्रत्येक विद्यार्थ्यांने विद्यार्थी दशेतच आर्थिक नियोजन करायला शिकले पाहिजे असे प्रतिपादन केले.
अधिक माहितीपूर्ण आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता कशी निर्माण करावी, पैसे आणि कर्जाचे प्रभावी व्यवस्थापन कसे करावे, सुधारित नियंत्रणाद्वारे खर्च कपात करून आर्थिक ध्येय कसे गाठावे याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर संदेश जगदाळे आणि वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. ज्योती चौगले यांच्या हस्ते प्रमुख मार्गदर्शक श्री. सुनील जाधव यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा. सिद्धी साळगावकर यांनी करून दिली. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. भाग्यश्री राजपूरकर, प्रा. श्रद्धा खूपटे,
प्रा. रोहिणी गीते, प्रा. ऋचा दळवी यांनी मेहेनत घेतली.