दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेज येथे कॅम्पस इंटरव्ह्यू संपन्न.
दापोली येथील दापोली एज्युकेशन सोसायटीचे दापोली अर्बन बँक सीनिअर सायन्स कॉलेज येथे दि. 22/08/2023 रोजी रसायन शास्त्र विभागातील एम. एस. सी. मधील शेवटाच्या वर्षाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस इंटरव्ह्यू चे आयोजन करण्यात आले होते. नामांकित कंपनींचे इंटरव्ह्यू एकाच छत्राखाली आयोजित करण्यात आले होते. या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये जवळपास 40 विद्यार्थी सहभागी झाले होते.
यात दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेज सोबतच डी.बी.जे. कॉलेज, चिपळूण, गोगटे जोगळेकर कॉलेज, रत्नागिरी तसेच मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र, रत्नागिरी येथील विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. ओलाॅन फार्मा, महाड, डिव्हाईन केमिकल्स, लोटे तसेच सुप्रिया लाइफसायन्स लिमिटेड, लोटे अशा नामांकित कंपन्यांनी इंटरव्ह्यू घेतले. कॉलेज चे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपप्राचार्य व रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. घनश्याम साठे यांच्या संकल्पनेतून झालेल्या या इंटरव्ह्यू बद्दल विद्यार्थ्यांनी आभार मानले.निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तत्काळ नियुक्ती पत्र देण्यात येणार असल्याचे कंपन्याचे अधिकारी यांनी सांगितले. यावेळी भारतातील खाजगी क्षेत्रातील नामांकित रासायनिक तसेच फार्मा कंपनीमध्ये काम करण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली याबद्दल दापोली शिक्षण संस्थेने रसायनशास्त्र विभागाचे कौतुक केले.