दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स महाविद्यालयाचे आंतर महाविद्यालयीन पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सुयश
दि. 24 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2022 रोजी अभिनव महाविद्यालय कर्जत येथे आंतरमहाविद्यालयीन झोनल (IV) पॉवरलिफ्टींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर स्पर्धेमध्ये दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स महाविद्यालयाचा विद्यार्थी अजलान काझी याने 93 किलो वजनी गटात 460 किलो वजन उचलत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. आंतरमहाविद्यालयीन झोनल लेवल स्पर्धेमध्ये महाविद्यालयाला सुवर्ण पदक मिळवून देणारा अजलान हा पहिला विद्यार्थी ठरला आहे. 19 ते 20 ऑक्टोबर 2022 मुंबई येथे होणाऱ्या आंतरमहाविद्यालयीन इंटर झोनल स्पर्धेमध्ये अजलान सहभागी होणार आहे.
त्याच्या या कामगिरीबद्दल संस्थेचे चेअरमन श्री. केदार साठे यांच्यासह सर्व संचालक तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे, स्पोर्ट्स डायरेक्टर प्रा. निधी भडवळकर, प्रा. नंदा जगताप, प्रा. शंतनु कदम, प्रा. प्रियांका साळवी, प्रा. सिध्दी साळगावकर, श्री. सुजित पवार, प्रा. अनिकेत नांदिस्कर यांनी अभिनंदन केले.