दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेज मधील विद्यार्थ्यांना मिळाला सक्सेस मंत्र.
30 सप्टेंबर 2022 रोजी दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज महाविद्यालयामध्ये वाणिज्य शाखेतील बी. एम. एस. व बी. कॉम.च्या विद्यार्थांसाठी ‘सक्सेस मंत्रा आणि इंटॅलीजंन्ट स्किल’ या विषयावर पुण्यातील ‘निलया फॉउंडेशन’कडून व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रा. पायल मेहता यांनी विध्यार्यांना करियर गाईडंन्स तसेच व्यावहारिक अकॉउंट्स कसे हाताळायचे व वाणिज्य आणि व्यवस्थापन विषयात आपले उत्तम करिअर कसे घडवायचे, याबद्दल मार्गदर्शन केले.
यावेळी कॉमर्स विभागाच्या प्रमुख प्रा. ज्योती चोगले, प्रा. श्रद्धा खुपटे, प्रा. ऋजुता जोशी, प्रा. सिद्धी साळगावकर व प्रा. ऋचा दळवी आदी उपस्थित होते. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्ष वाणिज्य वर्षाची विद्यार्थिनी रसिका बर्वे हिने केले. तसेच बी.एम.एस.च्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी रसिका ओक हिने प्रमुख वक्ते, मान्यवर तसेच उपस्थितांचे आभार मानले.