दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजमध्ये ‘बहर’ या विद्यार्थ्यांच्या लेखन व चित्रकला तसेच संबंधित कलांना प्रोत्साहन देणाऱ्या ‘ क्रिएटिव्हीटी कट्ट्याचे’ अनावरण..
दिनांक 10 सप्टेंबर, 2022 रोजी दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजमध्ये ‘बहर’ या विद्यार्थ्यांच्या लेखन व चित्रकला तसेच संबंधित कलांना प्रोत्साहन देणाऱ्या ‘ क्रिएटिव्हीटी कट्ट्याचे’ अनावरण करण्यात आले. याप्रसंगी उद्घाटनासाठी दापोली शिक्षण संस्थेचे संचालक श्रीयुत सौरभ बोडस हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते व त्यांनी फीत कापून औपचारिकरित्या बहर कट्ट्याचे उद्घाटन केले. ‘विद्यार्थ्यांचे सर्वांगीण पोषण होण्यासाठी, अशाप्रकारे त्यांच्या कलागुणांना वाव देणे व त्यांचे कौतुक करून त्यांना अधिकाधिक प्रोत्साहित करणे गरजेचे आहे’, असे मत या प्रसंगी प्रमुख अतिथी बोडस सर यांनी मांडले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच या कार्यक्रमसाठी मॅक्झिन आणि लिटरेचर पब्लिकेशन समितीच्या प्रमुख प्रा. ऋजुता जोशी, तसेच समिती सदस्या प्रा. ज्योती चोगले, प्रा. श्रुती आवळे व प्रा. श्राव्या पवार या महाविद्यालयीन सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.