दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स महाविद्यालयामध्ये ‘ डॉ. एस. आररंगनाथन जयंती ‘ निमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन …
दापोली येथील दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या ग्रंथालय विभागातर्फेदि. १२ ऑगस्ट २०२२ रोजी डॉ. एस. आररंगनाथन जयंती निमित्त ‘ द ग्रेट इंडियन्स ‘ विषयावर आधारीत विविध ग्रंथाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
सर्व प्रथम महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. घन:श्याम साठे यांनी डॉ. एस. आररंगनाथन यांच्या प्रतिमेचे पुजन केले.
या प्रसंगी डॉ. गंगा गोरे, प्रा. कैलास गांधी, प्रा. डॉ. बापु यमगर तसेच इतर सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
सदर ग्रंथ प्रदर्शनामध्ये स्वातंत्र्य लढा आणि स्वातंत्र्य चळवळीतील अनेक क्रांतीवीर तसेच भारतीय समाज सुधारक, समाज सेवक आणि भारतीय उद्योजक यांच्या बाबत माहिती देणारी अंदाजे २०० पुस्तके ठेवण्यात आली असुन महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षकआणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या साठी हे ग्रंथ प्रदर्शन सलग २ दिवस खुले ठेवण्यात आले आहे.
सदर ग्रंथप्रदर्शन यशस्वी रित्या पार पडावे यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्यडॉ. संदेश जगदाळे यांच्या मार्ग दर्शनाखाली ग्रंथालय समिती प्रमुख डॉ. विक्रम मासाळ आणि ग्रंथपाल श्रीमती कीर्ती परचुरे तसेच ग्रंथालय सहाय्यक अनघा शिंपी, ग्रंथालय सेवकओमकार पड्याळयांनी विशेष मेहेनत घेतली.