दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स महाविद्यालयामध्ये ‘ स्वच्छता कार्यक्रम ‘
दापोली येथील दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने
दि. १० ऑगस्ट २०२२ रोजी स्वराज्य महोत्सव अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे ‘ स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन ‘करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये एन. एस. एस. उपक्रम अधिकारी डॉ. राजेन्द्र मोरे आणि प्रा. अजिंक्य मुलुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील एन. एस. एस. सदस्य आणि स्वयंसेवकांनी महाविद्यालयाच्या परिसराची स्वच्छता केली.
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी हर घर तिरंगा उपक्रम समन्वयक प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे आणि आयोजन समन्वयक प्रा. संतोष मराठे यांच्या प्रोत्साहनाने एन.एस.एस अधिकारी, सदस्य आणि स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी विशेष मेहेनत घेतली.