दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये ‘बहर ‘ युवा महोत्सव जल्लोषात साजरा…
दि. २४ डिसेंबर २०१९ रोजी कोकणे सभागृह येथे माननीय प्रमुख पाहुणे प्रवीण पाटील ( D.Y.S.P. खेड
)आणि माननीय राजेंद्र पाटील ( P.I. दापोली ) यांच्या उपस्थितीत दापोली अर्बन बँक सिनीअर सायन्स
कॉलेजचा बहर युवा महोत्सव जल्लोषात साजरा झाला. याप्रसंगी संस्थेच्या संचालक मंडळाचे सदस्य
रामचंद्र कदम आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष सौरभ बोडस , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांची
सन्माननीय उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार सौरभ बोडस यांच्या हस्ते करण्यात आला.
या युवा महोत्सवाचे आयोजन दोन सत्रांत करण्यात आले असून प्रथम सत्रामध्ये वार्षिक पारितोषिक
वितरण समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी महाविद्यालयात दरवर्षी घेण्यात येणाऱ्या विविध मान्सून क्रीडा
स्पर्धा, सांस्कृतिक व साहित्यिक स्पर्धा तसेच मुंबई विद्यापीठा अंतर्गत असणारे विविध
आंतरमहाविद्यालयीन क्रीडा- सांस्कृतिक स्पर्धा, राष्ट्रीय सेवा योजना (N.S.S.) D.L.L.E. इत्यादी
विभागांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे बक्षीस, पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मान
करण्यात आला. त्याप्रसंगी आविष्कार कन्व्हेशन २०१९ मध्ये समन्वयक म्हणून कार्यरत प्रा. बापू यमगार
यांचा देखील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या युवा महोत्सवाच्या द्वितीय सत्रात शेतकरी हा विषय घेऊन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी चल
सर्जा, खेळ मांडला , डिपारी डिपांग इत्यादी मनोरंजन गीतांवर नृत्य सादर करून प्रेक्षकांसमोर शेतकऱ्याचे
जीवन चितारले.
तसेच 'आम्ही संगीतकार ' या विद्यार्थ्यांच्या ऑर्केस्ट्राने संयुक्त गायन-वादन करून सुप्रसिद्ध चित्रपट
गीते प्रस्तुत केली व सर्व प्रेक्षकांचे मन वेधून घेतले. या महोत्सवाच्या अंतिम टप्प्यात युवा महोत्सवाचे
समन्वयक प्रा. सदानंद डोंगरे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहित
झालेले प्रमुख पाहुणे मा. श्री. प्रवीण पाटील यांनी ,विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व घडवावे व
सुदृढ समाजाची निर्मिती करावी असे प्रेरित करणारे वक्तव्यही केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिपाली दिवाण,
प्रा. प्रिया करमरकर यांनी केली असून समन्वयक प्रा. सदानंद डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी
प्रतिनिधी जान्हवी दिवेकर आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी महोत्सवाच्या यशस्वितेसाठी
मोलाचे कार्य केले.