दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक स्पर्धांमध्ये घवघवीत यश.
दापोली,
मुंबई विद्यापीठाच्या ५४व्या युवा महोत्सवामध्ये उत्तर रत्नागिरी विभागात दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित दापोली अर्बन बँक सिनीयर सायन्स कॉलेज १३ पैकी ८ स्पर्धांमध्ये पारितोषिके प्राप्त करून विजेतेपदाचे मानकरी ठरले आहे.
या महाविद्यालयास प्राप्त झालेल्या पारितोषिकांमध्ये रोहन करकरे याने मिमिक्री, स्नेहा कासारे हिने मेहंदी, सायली पवार हिने पाश्चात्त्य संगीत या प्रकारांमध्ये प्रथम पारितोषिके मिळविली.
तसेच पारितोषिकांची परंपरा पुढे राखत तन्वी गुरव हिने शास्त्रीय व सुगम संगीत प्रकारात द्वितीय क्रमांक, सई सावंत हिने शास्त्रीय नृत्य कलेमध्ये तृतीय क्रमांक तर एकपात्री अभिनय प्रकारात द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच अलिझा परकार हिने कथाकथन स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त करीत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले. या युवा महोत्सवातील स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे, अभ्यासेतर उपक्रमांचे प्रमुख प्रा. संतोष मराठे, क्रमिक अभ्यासक्रम विभागाचे प्रमुख प्रा. कैलास गांधी यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. तसेच सांस्कृतिक स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. प्रियांका साळवी, प्रा. अजिंक्य मुलुख, प्रा. विश्वेश जोशी, प्रा. श्रुती आवळे, प्रा. स्वाती देपोलकर यांनी विशेष मेहनत घेतली.
या मुंबई विद्यापीठाच्या या ऑनलाइन युवा महोत्सवाच्या स्पर्धा पार पडण्यासाठी प्रा. सदानंद डोंगरे व प्रा. शंतनु कदम यांनी तांत्रिक सहाय्य केले.