दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये ‘ रिसेंट ट्रेंडस इन लाइफ सायन्स, एनर्जी अँड एन्व्हायरमेंट ‘ याविषयावर उद्बोधक ऑनलाईन राष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न
दापोली येथील दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये दिनांक २४ व २५ सप्टेंबर २०२१ रोजी ‘ रिसेंट ट्रेंडस इन लाइफ सायन्स, एनर्जी अँड एनव्हायरमेंट ‘ याविषयावर उद्बोधन करणारी राष्ट्रीय परिषद ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली.
‘ वैज्ञानिक संशोधनास चालना मिळावी, तसेच जीवशास्त्र, ऊर्जा व पर्यावरणातील विविध नवीन संकल्पनांविषयी विद्यार्थी, प्राध्यापक आणि इतर सहभागी उद्योजकांना मार्गदर्शन मिळावे ‘, हा या राष्ट्रीय परिषदेचा मुख्य हेतू होता.
दिनांक २४ सप्टेंबर २०२१ रोजी सर्वप्रथम
आयोजन समितीचे सचिव डॉ. बापू यमगर यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर कोकण विभागाचे सहसंचालक डॉ. संजय जगताप यांच्या हस्ते राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन व ‘ युरेका न्युजलेटरचे ‘ प्रकाशन करण्यात आले. सदर युरेका बातमीपत्रामध्ये विविध संशोधनपर लेखांचा समावेश करण्यात आला आहे. याप्रसंगी डॉ. संजय जगताप यांनी आपल्या उद्घाटनीय भाषणातून जीवशास्त्र विषयातील संशोधनाचे महत्व विशद केले.
या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षस्थान दापोली एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाहक डॉ. प्रसाद करमरकर यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून त्यांनी राष्ट्रीय परिषदेच्या यशस्वीतेसाठी मन:पुर्वक शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी लाईफ सायन्स राष्ट्रीय परिषदेचे प्रास्ताविक करुन उपस्थितांना परिषदेची रुपरेषा समजावली.
संशोधनाशी निगडित असणाऱ्या राष्ट्रीय परिषदेच्या प्रथम दिवशी प्रथम सत्रात व्याख्याते डॉ. एस. एस. देवकुळे यांनी ‘ जैविक ऊर्जा व पर्यावरण ‘ या विषयावर संशोधनास अनुकुल असणाऱ्या विविध नवीन विषयांची माहिती दिली.
तर द्वितीय सत्रात शिवाजी विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रीरंग यादव यांनी ‘पश्चिम घाटातील स्थानिक अधिवास धोक्यात असणाऱ्या वनस्पतींविषयी ‘ उपस्थितांशी सखोल संवाद साधुन वनस्पती संवर्धनासाठी सर्वांना प्रोत्साहित केले.
या राष्ट्रीय परिषदेच्या तृतीय सत्रात व्याख्याते श्री.किशोर शितोळे यांनी ‘ पाणी वापराचे नियोजन आणि जल संवर्धन ‘ तर चौथ्या सत्रात व्याख्याते डॉ. शैलेश वाघमारे यांनी ‘ अँटिबायोटिक्सच्या अतिवापरामुळे विषाणूं मध्ये निर्माण झालेल्या प्रतिरोधक क्षमतेविषयी ‘ उपस्थितांना मार्गदर्शीत केले.
लाइफ सायन्स राष्ट्रीय परिषदेच्या द्वितीय दिवशी प्रथम सत्रात सहभागितांची ओरल प्रेझेंटेशन घेण्यात आलीत.
याप्रसंगी डॉ. सुचंद्रा दत्ता यांनी ओरल प्रेझेंटेशन्सचे परिक्षण केले. यामध्ये हेंन्सल रॉड्रिग्ज (वनस्पतीशास्त्र) व जयश्री मेनन (प्राणिशास्त्र) यांनी क्रमश: प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
तदनंतर द्वितीय सत्रात व्याख्याते डॉ. इ.के नरेश्वर यांनी ‘जैवविविधता व हवामानाबद्दल ‘ व्याख्यान दिले. तर
तृतीय सत्रात व्याख्याते डॉ. प्रदीप सरवदे यांनी ‘ नॅनो मटेरियल फॉर एन्व्हायरमेंट ॲप्लिकेशन्स ‘ या विषयावर उपस्थितांना रंजक व सखोल माहिती सांगितली.
अंतिम सत्रात व्याख्याते डॉ. प्रवीण पंड्या यांनी ‘पर्यावरणाचे पुर्नस्थापना’ विषयी उपस्थितांना मार्गदर्शन करुन प्रश्नोत्तरांच्या माध्यमाने त्यांच्या शंकांचे निरसनही केले.
या लाइफ सायन्स राष्ट्रीय परिषदेच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन लांजा येथील एस. सी.एस. कॉलेजचे प्राचार्य डॉ.अरविंद कुलकर्णी यांची उपस्थिती लाभली.
समारोप कार्यक्रमात आयोजन समितीचे सचिव डॉ. बापू यमगर यांनी ऑनलाईन लाइफ सायन्स राष्ट्रीय परिषदेचा थोडक्यात आढावा घेतला.
या राष्ट्रीय परिषदेत उत्सफुर्तपणे सहभागी होऊन
डॉ. बी.आर. शिर्के, प्राचार्य श्री.सदानंद धारप , डॉ. रविंद्र बागुल , डॉ.अविनाश आडे ,डॉ. राजेश कांबळे अशा विद्यापीठ व महाविद्यालयीन उच्च पदस्थ मान्यवरांनी विविध सत्रांचे अध्यक्ष स्थान भुषविले.
समारोप प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी परिषदेच्या यशस्वीतेबाबत कौतुक व्यक्त करीत सर्व कर्मचाऱ्यांच्या मेहेनेतीची दखल घेतली.
सदर परिषदेच्या यशस्वीतेसाठी दापोली एज्युकेशन सोसायटीतील संचालक सदस्य, तसेच महाविद्यालयातील डॉ. बापू यमगर, डॉ. विक्रम मासाळ, डॉ. राजेन्द्र मोरे, प्रा. नंदा जगताप, प्रा. प्रियांका साळवी प्रा. सदानंद डोंगरे, प्रा. शंतनु कदम व इतर सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.