• Home
  • Management
    • Board of Directors
    • Goals and Objectives
    • Sister Institutions
  • College
    • About College
    • Administration
    • CDC
    • Milestones
    • Committee
    • Prospectus
    • Awards and Recognition
    • Code of Conduct
    • Grievances and Redressal
  • Academics
    • Programme
    • Admission
    • Fee Structure
    • Departments
      • Commerce
      • Science
        • Chemistry
        • Botany
        • Zoology
        • Physics
        • Microbiology
        • Computer Science
        • Environmental Science
      • Foundation Course
    • Academic Calender
    • Bridge/Remedial Coaching
    • Master Time Table
    • Scholarships
    • Mentor-Mentee
    • Add-On Courses
  • Examination
  • IQAC
    • SSR
    • AQAR
    • Best Practices
  • Activities
    • Research
    • NSS
    • DLLE
    • Science Association
    • Cultural Activities
    • Placement Cell
    • Nature Club
    • Collaborations
    • Woman Development Cell
    • Post Graduate Student and Teaching Staff Research Forum
    • Sports
    • Competitive Examination Center
    • “Eureka” e-infoletter
  • Learning Resources
    • Library
    • Laboratories
    • Botanical Garden
  • Facilities
    • Infrastructure
    • Canteen
    • Ladies Hostel
    • Gymkhana
    • ICT Facilities
  • Alumni
    • Alumni Committee
    • Alumni Contact
  • Contact
Have any question?
(+91) 7709252933
[email protected]
Dapoli Urban Bank Senior Science College
  • Home
  • Management
    • Board of Directors
    • Goals and Objectives
    • Sister Institutions
  • College
    • About College
    • Administration
    • CDC
    • Milestones
    • Committee
    • Prospectus
    • Awards and Recognition
    • Code of Conduct
    • Grievances and Redressal
  • Academics
    • Programme
    • Admission
    • Fee Structure
    • Departments
      • Commerce
      • Science
        • Chemistry
        • Botany
        • Zoology
        • Physics
        • Microbiology
        • Computer Science
        • Environmental Science
      • Foundation Course
    • Academic Calender
    • Bridge/Remedial Coaching
    • Master Time Table
    • Scholarships
    • Mentor-Mentee
    • Add-On Courses
  • Examination
  • IQAC
    • SSR
    • AQAR
    • Best Practices
  • Activities
    • Research
    • NSS
    • DLLE
    • Science Association
    • Cultural Activities
    • Placement Cell
    • Nature Club
    • Collaborations
    • Woman Development Cell
    • Post Graduate Student and Teaching Staff Research Forum
    • Sports
    • Competitive Examination Center
    • “Eureka” e-infoletter
  • Learning Resources
    • Library
    • Laboratories
    • Botanical Garden
  • Facilities
    • Infrastructure
    • Canteen
    • Ladies Hostel
    • Gymkhana
    • ICT Facilities
  • Alumni
    • Alumni Committee
    • Alumni Contact
  • Contact

News

  • Home
  • Blog
  • News
  • दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

  • Categories News
  • Date December 25, 2025

दापोली शिक्षण संस्थेच्या दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयात बहर या युवा महोत्सवा अंतर्गत वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी व्होल्गा रेसिडेन्सी आणि व्होल्गा इन्स्ट्रुमेंटस प्रायव्हेट लिमिटेडचे प्रमुख श्री. धनंजय यादव प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दापोली शिक्षण संस्थेचे संचालक आणि ए. जी. हायस्कूलच्या स्कूल कमिटी चे चेअरमन श्री. रवींद्र कालेकर यांनी भूषवले. कार्यक्रमाला संस्थेचे सहसचिव श्री. निलेश जालगांवकर, संचालक सी.ए. श्रेयस काकिर्डे आणि श्री. अशोक जाधव, महाविद्यालयाच्या आय. क्यू. ए. सी.चे सदस्य डॉ. दीपक हर्डीकर हे सुद्धा यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेऊन या प्रगतीचे श्रेय विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचबरोबर संस्थेने वेळोवेळी दिलेला भक्कम पाठिंबा यांना दिले. युवा महोत्सवाचे प्रमुख प्रा. डी. डी. कुलकर्णी यांनी या वर्षात विविध विभागात विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी मिळवलेल्या यशाचा आणि महाविद्यालयाने राबवलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला.

आपल्या भाषणात श्री. यादव यांनी महाविद्यालयाच्या विविध विभागांना भेट देऊन भारावून गेल्याचे सांगत महाविद्यालयाचे आणि संस्थेचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी महाविद्यालयीन जीवनात एन्जॉय करतानाच वेळेचा आदर करण्याचे तसेच चांगले मित्र जोडण्याचे महत्व सांगितले. विद्यार्थ्यांना आवाहन करताना त्यांनी सांगितले की मोठमोठ्या शहरातील महाविद्यालयांना इतकेच तुमचे महाविद्यालय सक्षम आहे त्याचा तुम्ही लाभ घ्या. शिक्षण पूर्ण केल्यावर कमी पैशातसुद्धा उत्तम व्यवसाय कसा करायचा याचे मार्गदर्शन करण्याचे आश्वासन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले.

श्री. रवींद्र कालेकर यांनी आपल्या भाषणात दापोली शिक्षण संस्था आणि त्यांच्या शाळा आणि महाविद्यालय परिसर यामध्ये अनेक महनीय व्यक्तींचा वावर झाला असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन ज्ञानाबरोबरच अवांतर वाचनातून सामाजिक भान आत्मसात करावे असे मांडले.
यावेळी झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात कला, क्रीडा, संशोधन आणि इतर स्पर्धांमध्ये अव्वल स्थान मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या विविध स्पर्धात किंवा राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय स्पर्धात तसेच महाविद्यालयातील विविध स्पर्धात भाग घेऊन यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाची टी. वाय. बी. कॉम. ची विद्यार्थिनी श्रुती साखळकर ही स्टुडंट ऑफ द ईयर या पुरस्काराची मानकरी ठरली. स्वातंत्र्यसैनिक साथी चंदुभाई मेहता ट्रस्ट यांच्या वतीने कै. शर्वरी आणि डॉ. प्रशांत किसान मेहता स्मृतीप्रीत्यर्थ हा पुरस्कार दिला जातो. त्याचबरोबर तिने कै. आशालता शरदचंद्र मराठे स्मृतीप्रीत्यर्थ युवा वक्ता सन्मान चषक आणि कै. विजया आणि कै. विनायक बाळकृष्ण गांधी स्मृतीप्रीत्यर्थ गांधी करंडक या दोन्ही पुरस्कारावर आपले नाव कोरले.
एस. वाय. बी. एस्सीची ग्रीष्मा खानविलकर ही यावर्षीची रीडर ऑफ द इयर या पुरस्काराची तर एस. वाय बी. कॉम ची वैष्णवी जोगळेकर ही स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर या पुरस्काराची मानकरी झाली. एन.सी.सी. बेस्ट कॅडेट हा पुरस्कार प्रार्थना प्रदीप मेहेंदळे हिने पटकावला. एन. एस.एस बेस्ट लीडर हा पुरस्कार मयुरेश मुरलीधर जाधव आणि इकरा हकीम ममतुले ह्यांना मिळाला.
याशिवाय महेश मालगुंडकर, पार्थ सामल, तन्मय मालुसरे, जान्हवी साळगावकर महेक रमजाने यांनी मोनो ऍक्ट, कार्टूनिंग, वादविवाद, कोलाज मेहंदी इ. स्पर्धांमधील यशाबद्दल तर चंदना मोरे, युवा खान, आंबेडे दिया, मर्चंडे सुजल, साळगावकर अलिश, तांडेल विपुल यांना तसेच अशा अनेक विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धांमधील यशाबद्दल गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तेजस मेहता आणि प्रा. दीपाली नागवेकर यांनी केले.
सदर कार्यक्रमात प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे, उपप्राचार्य डॉ. घनश्याम साठे यांसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते.

  • Share:
Swapnil Salvi

Previous post

दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजचे विशेष निवासी श्रम संस्कार शिबिर उत्साहात संपन्न.
December 25, 2025

Next post

दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
January 3, 2026

Search

Department

  • About Department
  • Faculty
  • Courses
  • PO, PSO & CO
  • Facilities
  • Research
  • Guest Faculty
  • Results
  • Achivements
  • Future Plans
  • Activities

Dapoli Urban Bank Senior Science College

(+91) 7709252933

[email protected]

Links

  • University of Mumbai
  • UGC
  • Maharashtra Govt.
  • Ministry of HRD
  • NAAC
  • RTI Declaration

Dapoli Urban Bank Senior Science College Dapoli site by VIKCON Consulting. Powered by WordPress.