दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिराला उत्साहात सुरुवात*
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसांचे विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिर उंबर्ले या दत्तक गावातील जिल्हा परिषद आदर्श शाळा, उंबर्ले येथे सुरू झाले.सदरचे शिबीर 27 डिसेंबर 2024 ते 2 जानेवारी 2025 या दरम्यान गावात नियोजित आहे.
या शिबिराचे उदघाटन मा. डॉ. अमित देवगिरीकर, सहाय्यक प्राध्यापक, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दापोली एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ. प्रसाद करमरकर, विश्वस्त मा. समीर गांधी, उपप्राचार्य डॉ. घनश्याम साठे, सरपंच मा. श्री नरेंद्र मांडवकर, मुख्याध्यापिका सौ. स्वप्नजा शिंदे,श्री. सुधीर घांगुर्डे, उपाध्यक्ष, ग्रामविकास मंडळ उंबर्ले, श्री. अनंत काष्टे, सचिव ग्रामविकास मंडळ उंबर्ले आणि सौ. निलम खळे महिला ग्रामविकास अध्यक्षा उंबर्ले, महाविद्यालयातील प्राध्यापक डाॅ.विक्रम मासाळ, प्रा. तेजस मेहता व राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ. विजय गुरव, प्रा. स्वाती देपोलकर, प्रा. नेत्रांजली महाडिक व अनेक मान्यवर व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ अमित देवगिरीकर यांनी स्वयंसेवकांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या ध्येयाशी एकरुप होऊन काम करण्यास सांगितले. गावचे सरपंच श्री नरेंद्र मांडवकर यांनी स्वयंसेवकांना ग्रामपंचायत नेहमी सहकार्य करेल असे आश्वासन दिले. उपप्राचार्य डॉ. घनश्याम साठे यांनी सर्व स्वयंसेवकांना आपल्यातील सुप्त गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी उद्युक्त केले. यावेळी कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. मनोज लाड यांनी शिबिराचे प्रास्ताविक सादर केले. कार्यक्रम अधिकारी प्रा. अजिंक्य मुलूख यांनी आभारप्रदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनिरुद्ध सुतार यांनी केले.