दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयात बुद्धिबळ स्पर्धा संपन्न
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयात महाविद्यालयाच्या क्रीडा विभागातर्फे बुद्धिबळ स्पर्धांचे दि. 22/07/2024 रोजी आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महाविद्यालयाच्या क्रीडा संचालक प्रा. निधी भडवळकर, क्रीडा समन्वयक डॉ. विजय गुरव तसेच इतर प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. सकाळी 9 वाजता सुरू आलेल्या या स्पर्धांमध्ये 8 विद्यार्थिनी आणि 16 विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.
एकूण 5 राऊंड मध्ये ही स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेत विद्यार्थी गटात विपुल विलास तांडेल या द्वितीय वर्ष विज्ञान च्या विद्यार्थ्याने प्रथम तर तनय महेंद्र मिश्रा याने द्वितीय क्रमांक मिळवला.
विद्यार्थिनी गटात तृतीय वर्ष बीएमएसच्या रसिका संजय ओक हिने प्रथम तर श्रुती प्रफुल्ल बिवलकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला.
या स्पर्धेसाठी ऋतिक वाडकर, आविष्कार गावनांग, अनिरुद्ध भागवत यांनी पंच म्हणून काम केले.