दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या श्रवण श्रीरंग बागकर याचे सॉफ्टबॉल स्पर्धेत यश.
दिनांक 6 आणि 7 मार्च 2024 या कालावधी मध्ये आझाद मैदान, दापोली येथे मुंबई विद्यापीठाअंतर्गत घेण्यात आलेल्या पुरुष सॉफ्टबॉल आंतरविभागीय स्पर्धेमध्ये दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयाच्या श्रवण श्रीरंग बागकर याने आपल्या खेळाचा ठसा उमटवला. त्याच्या उत्तम खेळामुळे त्याची मुंबई विद्यापीठाच्या पुरुष सॉफ्टबॉल संघात निवड झाली आहे.
पुढील आंतरविद्यापीठ स्पर्धा ह्या 13 ते 18 मे 2024 या कालावधीत बँगलोर येथे बेंगलूरू विद्यापीठामध्ये घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये श्रवण बागकार मुंबई विद्यापीठाच्या संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
श्रवणच्या या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे, उपप्राचार्य डॉ. घनश्याम साठे, क्रीडा विभागप्रमुख प्रा. निधी भडवळकर, प्रा. संतोष मराठे, डॉ. नंदा जगताप, प्रा. शंतनु कदम, प्रा. प्रियांका साळवी, प्रा. सिद्धी साळगावकर आणि इतर सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.