दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज मध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळा तर्फे महाविद्यालयात मराठी साहित्य आणि संस्कृती यासंबंधी जागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये शासनाने स्वीकृत केलेले महाराष्ट्र राज्याचे राज्य गीत ‘ गर्जा महाराष्ट्र माझा ‘ याचे गायन सकाळी साडे आठ वाजता राष्ट्रगीत गायनानंतर सर्व विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले. यावेळी प्रा. संतोष मराठे यांनी या राज्य गीताची माहिती उपस्थितांना करून दिली. त्यानंतर दुपारी साडे अकरा वाजता विद्यार्थांनी बनवलेल्या मराठमोळ्या पाककृतींची स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये महेक पठाण, पूजा फोडकर, ऋजुता करमरकर, अस्मी दफेदार, वैष्णवी सातर्डेकर इ. विद्यार्थिनींनी पुरण पोळी, पावभाजी, थालीपीठ, गव्हाच्या पिठाचे लाडू, साबुदाणे वडे, मोदक, जाळीदार घावन इ. विविध पदार्थ करून आणले होते. परीक्षक म्हणून डॉ. गंगा गोरे, प्रा. श्रद्धा खुपटे, श्रीम. कीर्ती परचुरे यांनी परिक्षणाचे काम केले. पूजा फोडकर यांनी या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तर ऋजुता करमरकर आणि वैष्णवी सातर्डेकर यांना विभागून द्वितीय क्रमांक मिळाला. तसेच महेक पठाण हिने तिसरा क्रमांक मिळवला.
त्यानंतर मराठी भाषेतील साहित्य कृतींच्या अभिवाचनाचा कार्यक्रम ‘ वाचू मराठी कौतुके ‘ झाला. यामध्ये सुरुवातीला ग्रंथपाल कीर्ती परचुरे यांनी कौशल इनामदार यांनी तयार केलेल्या मराठी अभिमान गीताची माहिती सांगून सर्वांना त्या गीताची दृकश्राव्यफित ऐकवली. त्यानंतर अनिरुद्ध करमरकर, अक्षता जोशी, अंबर जोशी, प्रसाद महाजन, सोनल शिंदे, सानिका ओक, मधुरा बडे, सुमय्या मुजावर या विद्यार्थांनी आणि प्रा. संतोष मराठे, प्रा. ऋजुता जोशी, प्रा. सिद्धी साळगावकर या प्राध्यापकांनी पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज, इंदिरा संत, विद्याधर गोखले, सलील कुलकर्णी, कॅप्टन शशिकांत पित्रे यांसह अनेक नव्या लेखकांच्या साहित्यकृती मधील भागाचे अभिवाचन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थीनी आणि मराठी वाङ्मय मंडळाच्या माजी प्रमुख प्रा. मुग्धा कर्वे या मुंबई येथून दूरभाष पद्धतीने सहभागी झाल्या होत्या.
विद्यार्थ्यांच्या उत्साहाने रंगतदार झालेल्या या कार्यक्रमाचा शेवट कुसुमाग्रजांच्या क्रांतीचा जयजयकार या कवितेने करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार मराठी वाङ्मय मंडळाच्या प्रमुख प्रा. ऋजुता जोशी यांनी मानले.
या कार्यक्रमाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे आणि उपप्राचार्य डॉ. घनश्याम साठे यांनी कौतुक केले.