*दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये इन्स्पायर कँपचे उद् घाटन*
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये सायन्स असोसिएशन च्या वतीने ०१/०२/२०२३ रोजी पाच दिवसाच्या डी. इ. एस- इन्स्पायर कॅम्पचे उदघाटन करण्यात आले.
मुलभूत विज्ञानाबद्दल विद्यार्थ्यांची गोडी वाढावी यासाठी २०१५ सालापासून दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी करण्यात येते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सेंटर फॉर सिटिझन सायन्स पुणेचे सचिव श्री. मयुरेश प्रभुणे उपस्थित होते. त्यांचे प्रथम सत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले, त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सौर माला निर्मितीच्या अनेक रंजक घटना उलगडून संगितल्या. तसेच सर्व विद्यार्थांसाठी आणि दापोली व परिसरातील नागरिकांसाठी रात्री अवकाश दर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात कॅम्प मधील विद्यार्थ्यांनी तसेच शहरातील नागरिकांनी दुर्बिणीद्वारे अवकाश दर्शनाचा आनंद लुटला. या सत्रालाही श्री प्रभुणे यांचे मार्गदर्शन लाभले.
संपूर्ण कॅम्प दरम्यान विज्ञानातील विविध शाखेतील तज्ञ मार्गदर्शकाची एकूण दहा मार्गदर्शन सत्रे तसेच सहा प्रत्यक्षिक सत्रे यांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कॅम्पसाठी दापोली तसेच लगतच्या खेड तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयाचे एकूण एकशे वीस विद्यार्थी सहभागी झाले आहेत. शिबिराचे उद् घाटन दापोली एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ. प्रसाद करमरकर यांनी केले व त्यांनी सर्व विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या.
या कॅम्पच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे उपप्राचार्य डॉ. घनशाम साठे सायन्स असोसिएशनचे प्रमुख प्रा. संतोष मराठे इन्स्पायर कॅम्प समन्वयक प्रा. शंतनू कदम हे उपस्थित होते.